'तुम्हाला राज्य चालवायला दिलंय की स्वयंपाक करायला' राष्ट्रवादी काँग्रस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडून शिवसेना पक्षावर टीकास्त्र

पुन्हा सरकार आल्यानंतर १० रुपयात जेवण देण्याची घोषणा शिवसेनेने वचननाम्यात केली आहे. यावर राष्ट्रवादी पक्षाचे (National Congress Party) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी सोलापूर (Solapur) येथील सभेत जोरदार टीका केली आहे.

Sharad Pawar And Uddhav Thackeray (Photo Credit: PTI)

विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2019) पार्श्वभूमीवर शिवसेना (Shiv Sena) पक्षाकडून वचननामा जाहीर करण्यात आला आहे. पुन्हा सरकार आल्यानंतर १० रुपयात जेवण देण्याची घोषणा शिवसेनेने वचननाम्यात केली आहे. यावर राष्ट्रवादी पक्षाचे (National Congress Party) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी सोलापूर (Solapur) येथील सभेत जोरदार टीका केली आहे. तुम्हाला राज्य चालवायला दिले आहे की, स्वयंपाक करायला? असा प्रश्न उपस्थित करुन पवार यांनी शिवसेनेला सणसणीत टोला लगावला आहे. याआधीही युतीचे सरकार असताना झुणका भाकर योजना सुरु केली होती, ही योजना कधी बंद झाली कळालेही नाही, अशा शब्दात शरद पवार यांनी शिवसेनेचा समाचार घेतला आहे.

नुकतीच शरद पवार यांची सोलापूर येथील बार्शी मतदारसंघात सभा पार पडली. त्याचबरोबर आज शिवसेना पक्षाचा वचननामा जाहीर झाला आहे. यात शिवसेना पक्षाकडून महाराष्ट्रातील जनतेला १० रुपयांत भोजन देण्याचे प्रमुख वचन देण्यात आले आहे. हाच धागा पकडून पवार यांनी आपल्या खास शैलीत शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. "युतीचे सरकार असताना शिवसेनेने १ रुपयांत झुणका-भाकर ही योजना सुरू केली होती. मात्र, ही योजना कधी बंद झाली ते कळलेही नाही. तुम्हाला राज्य चालवायला दिले आहे का स्वयंपाक करायला?" अशा शब्दात शरद पवार यांच्याकडून शिवसेनेवर टिकास्त्र सोडण्यात आले आहे.

हे देखील वाचा-Maharashtra Assembly Eections 2019: शिवसेना उमेदवार प्रदीप शर्मा यांच्या प्रचाराचे 'शेर आया, शेर आया' रॅप साँग व्हायरल; पहा व्हिडीओ

भाजपने सत्तेवर आल्यानंतर अरबी समुद्रात शिवाजी महाराजांचे स्मारक उभे करू, असे आश्वासन दिले होते. पण समुद्रात एक वीटही उभी राहिली नाही. उलट शिवछत्रपतींच्या काळात ज्या किल्ल्यांवर भवानी तलावर तळपली, त्या किल्ल्यांवर भाजप-शिवसेनेच्या काळात 'छमछम' बघावी लागेल अशी चिन्हे आहेत,' अशी खंतही शरद पवार यांनी व्यक्त केली आहे.