Sex Power Pills: दारू प्यायल्यानंतर घेतल्या Viagra च्या दोन गोळ्या; नागपुरात 41 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

त्याची अवस्था पाहून त्याच्या मैत्रिणीने त्याला वैद्यकीय मदत घेण्यास सांगितले, पण त्याने नकार दिला. यानंतर त्याची प्रकृती अधिकच बिघडू लागल्यावर त्याला रुग्णालयात नेण्यात आले,

Death | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

नागपुरात (Nagpur) दारूच्या नशेत व्हायग्राची गोळी (Viagra Pills) घेतल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. सुरुवातीला त्याला मळमळ आणि अस्वस्थ वाटले, परंतु तो रुग्णालयात गेला नाही. नंतर प्रकृती बिघडू लागल्यावर त्याला रुग्णालयात नेण्यात आले, तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले. डॉक्टरांनी ही दुर्मिळ घटना असल्याचे म्हटले आहे. दारू आणि गोळ्यांच्या मिश्रणामुळे उच्च रक्तदाबामुळे या 41 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही व्यक्ती आपल्या मैत्रिणीसोबत हॉटेलच्या रूममध्ये थांबली होती. रात्री दोघांनी पार्टी केली आणि दारू प्यायली. यादरम्यान, या व्यक्तीने सिल्डेनाफिलच्या दोन 50 मिलीग्रामच्या गोळ्या घेतल्या. ही गोळी व्हायग्रा या ब्रँड नावाने विकली जाते. त्यानंतर या व्यक्तीचा मृत्यू झाला. या व्यक्तीला कोणतेही जुने गंभीर वैद्यकीय आजार किंवा शस्त्रक्रिया झाल्याचे रेकॉर्ड नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

पार्टीनंतर दुसऱ्या दिवशी या व्यक्तीने मळमळ आणि उलट्या झाल्याची तक्रार केली. त्याची अवस्था पाहून त्याच्या मैत्रिणीने त्याला वैद्यकीय मदत घेण्यास सांगितले, पण त्याने नकार दिला. यानंतर त्याची प्रकृती अधिकच बिघडू लागल्यावर त्याला रुग्णालयात नेण्यात आले, मात्र दुर्दैवाने रुग्णालयात पोहोचताच त्या व्यक्तीला मृत घोषित करण्यात आले. अभ्यासानुसार, सेरेब्रोव्हस्कुलर हॅमरेजमुळे त्या माणसाचा मृत्यू झाला, जो मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाल्यावर होतो. (हेही वाचा: Ahmednagar: रात्रीचे इडली-सांबर खाल्ल्याने विद्यार्थिनीचा मृत्यू)

पोस्टमॉर्टम स्कॅनमध्ये डॉक्टरांना 300 ग्रॅम रक्त जमा झाले असल्याचे आढळले. त्यांचा असा निष्कर्ष आहे की, या व्यक्तीचा मृत्यू अल्कोहोल आणि ड्रग्सच्या मिश्रणामुळे तसेच आधीच अस्तित्वात असलेल्या उच्च रक्तदाबामुळे झाला. अभ्यासात असेही म्हटले आहे की, वैद्यकीय सल्ल्याशिवाय इरेक्टाइल डिसफंक्शन औषधे घेण्याच्या जोखमींबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी त्यांनी हे दुर्मिळ प्रकरण प्रकाशित केले.