Nagpur: नागपूर येथील महिला होमगार्डचा विनयभंग, पोलीस उपनिरीक्षक निलंबित
मुंबईत (Mumbai) एका महिला पोलीस अधिकाऱ्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची घटना ताजी असताना नागपूर (Nagpur) येथील एका महिला होमगार्डचा विनयभंग (Sexual Harassment) झाल्याची घटना उघडकीस आली आहे.
मुंबईत (Mumbai) एका महिला पोलीस अधिकाऱ्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची घटना ताजी असताना नागपूर (Nagpur) येथील एका महिला होमगार्डचा विनयभंग (Sexual Harassment) झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पीडित होमगार्ड महिलेने एका पोलीस उपनिरीक्षकाविरोधात यशोधरा नगर पोलीस ठाण्यात (Yashodhara Nagar Police Station) गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर संबंधित पोलीस निरीक्षकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तसेच याप्रकरणातील पुढील चौकशीला सुरुवात केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला नागपूर येथील यशोधरानगर पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. याच पोलीस ठाण्यात उपनिरीक्षक पदावर असलेल्या अशोक मेश्राम असे संशयित आरोपीचे नाव आहे. दरम्यान, पीडित होमगार्ड महिलेने आरोपीविरोधात विनयभंग केल्याची तक्रार दाखल केली आहे. यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करण्यास सुरुवात केली. तसेच नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी आरोपीला निलंबित केल्याची माहिती समोर आली आहे, अशी माहिती एका मराठी वेबसाईटने त्यांच्या वृत्तात दिली आहे. हे देखील वाचा- Mumbai Fake Vaccination Scam: मुंबईतील 'या' 6 केंद्रात सुरु होते बोगस लसीकरण, 8 जणांना अटक
यापूर्वी मुंबई पोलीस दलात सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या एका महिलेला शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार केल्याची घटना समोर आली होती. एवढेच नव्हेतर, नरधमाने लैंगिक अत्याचार करतानाचा व्हिडिओ काढला होता. त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर अनेकदा तिच्यावर बलात्कार केला. आरोपीच्या सततच्या त्रासाला कंटाळून पीडितेने मेघवाडी पोलिसांत गुन्हा नोंदवला होता. याप्रकरणातील आरोपी एका खाजगी बॅंकेत अधिकारी पदावर कामाला असल्याचे कळत आहे. तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांची ओळख झाल्याचे सांगितले जात आहे.