विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदी विजय वडेट्टीवार यांची वर्णी

यापूर्वी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी आपल्या पदाचा राजीनामा पदश्रेष्ठींकडे सोपवला होता.

Vijay Wadettiwar (Photo Credits-Facebook)

विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदी विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांची वर्णी लागली आहे. यापूर्वी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी आपल्या पदाचा राजीनामा पदश्रेष्ठींकडे सोपवला होता. त्यानंतर अखेर त्यांचा राजीनामा राहुल गांधी यांनी स्विकारल्यानंतर विरोधी पक्षनेते पद रिक्त होते. त्यामुळे या पदासाठी कोणाची नेमणूक करायची याबद्दल पक्षात चर्चा सुरु होती. त्यानंतर आज काँग्रेस पक्षाकडून विदर्भातील नेते विजय वडेट्टीवार यांच्यावर ही जबाबदारी देण्यात आली आहे.

विखे पाटील यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांनी राज्यातील आदेश जाहीर केले होते. त्यानंतर दोन्ही सभागृहाच्या नेतेपदी बाळासाहेब थोरात यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र नेतेपदासाठी वडेट्टीवार यांचे नाव आघाडीवर मानले जात होते.

(मुंबई: राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला आमदारकीचा राजीनामा, भाजप पक्षात प्रवेश करणार?)

त्यामुळे आज विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदी वडेट्टीवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच विजय वडेट्टीवार यांनी लोकसभा निवडणुकीत राज्यातून एकमेव जागेवर काँग्रेस पक्षाला विजय मिळवून दिला होता.