महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019: सातारा जिल्ह्यातील मतदारसंघ कराड दक्षिण, कराड उत्तर, कोरेगांव यासह इतर जागांवरील उमेदवार यादी, लढत आणि राजकीय इतिहास घ्या जाणून
महाराष्ट्रात 288 मतारसंघासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडेल. 21 ऑक्टोबर या दिवशी प्रत्यक्ष मतदान तर, 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी पार पडणार आहे.
Maharashtra Assembly Elections 2019: सातारा जिल्ह्यात एकूण 8 विधानसभा मतदारसंघ येतात. कोरेगांव (Koregaon), पाटण ( Patan), फलटण (Phaltan) , माण (Man), वाई (Wai) , सातारा, कराड उत्तर ( Karad North) विधानसभा मतदारसंघ कराड दक्षिण (Karad South), अशी या मतदारसंघाची नावे आहेत. राज्याच्या स्थापनेपासूनच महाराष्ट्राच्या राजकारणावर सातारा (Satara) जिल्ह्याचा मोठा प्रभाव पाहायला मिळत आहे. राज्याचे पहिले मुख्यमंत्री आणि देशाचे माजी उप-पंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राचा पाया घातला. तेव्हापासून महाराष्ट्राच्या राजकारणात पश्चिम महाराष्ट्राचा वरचष्मा राहिला आहे. या मतदारसंघांपैकी कराड दक्षिण, कराड उत्तर, कोरेगाव आणि वाई या मतदारसंघातील राजकीय संघर्ष, प्रमुख लढती आणि विद्यमान स्थितीचा घेतलेला हा आढावा.
कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ
कृष्णा कोयना नद्यांच्या संगमावर वसलेले कराड हे स्वातंत्र्यपूर्व भारतापासून आज तागायत चर्चेत असते. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हेही कराडचेच. असे हे कराड शहर कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात येते. सध्या या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शामराव पाटील प्रतिनिधित्व करतात. 2014 च्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेस पक्षाच्या धैर्यशील कदम यांचा पराभव केला.
कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ निवडणूक निकाल 2014
1) शामराव पाटील,राष्ट्रवादी – 78,324
2)धैर्यशील कदम ,काँग्रेस – 57,817
3)मनोज घोरपडे,स्वाभिमानी शेतकरी संघटना – 43,903
4) नरेंद्र पाटील,शिवसेना – 5,657
5) राजू केंजळे,मनसे – 2,091
कोरेगाव विधानसभा मतदारसंघ
विधानसभा निवडणूक 2014 च्या मतदानाच्या आकडेवारीवर नजर टाकता कोरेगाव विधानसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पकड असल्याचे दिसते. 2014 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि मनसे यांनी अनुक्रमे एक, दोन, तीन, चार आणि पाचव्या क्रमांकाची मते मिळवली होती.
कोरेगाव विधानसभा मतदारसंघ निवडणूक निकाल 2014
1) शशिकांत शिंदे,राष्ट्रवादी – 95,213
2)विजयराव कणसे ,काँग्रेस – 47966
3)हणुमंत चवरे, शिवसेना – 15862
4) संजय भगत,स्वाभिमानी शेतकरी संघटना – 13,126
5) युवराज पवार,मनसे – 1,766
वाई विधानसभा मतदारसंघ
आजघडीला वाई विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पकड असल्याचे दिसते. विधानसभा निवडणूक 2014 ची आकडेवारी पाहता इथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, काँग्रेस, भाजप, शिवसेना आणि अपक्ष यांना अनुक्रमे पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या क्रमांकाची मतं मिळाली आहेत.
वाई विधानसभा मतदारसंघ निवडणूक निकाल 2014
1) मकरंद पाटील,राष्ट्रवादी – 10,12,18
2) मदन भोसले ,काँग्रेस – 62,51,6
3) बाजीराव जाधव, बिजेपी – 25255
4) मारूती बावलेकर,शिवसेना – 23,34,3
5) संजय गायकवाड, अपक्ष – 1382
दरम्यान, या वेळी विधानसभा निवडणूक प्रक्रियेत महाराष्ट्रात 8 कोटी 94 लाख मतदार मतदान करतील. महाराष्ट्रात 288 मतारसंघासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडेल. 21 ऑक्टोबर या दिवशी प्रत्यक्ष मतदान तर, 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी पार पडणार आहे.