Sarthi Recruitment 2019: महाराष्ट्र सरकारच्या 'किसान मित्र' पदासाठी विज्ञान शाखेतील 702 पदवीधरांना सुवर्णसंधी

यासाठी बीएससी(कृषी) किंवा बीएससी (उद्यानविद्या) या शाखेतील शिक्षण घेतलेले उमेदवार अर्ज करू शकतात.

Image Used For Representational Purpose Only | (Photo Credits: File Photo)

महाराष्ट्र सरकारतर्फे  छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेच्या माध्यमातून  शेतीवर अवलंबून ग्रामीण जनतेसाठी सारथी या मार्गदर्शनपर उपक्रमाचे सुरुवात करण्यात आली होती. या पथदर्शी प्रकल्पात किसान मित्र (Kisan Mitra)  या पदासाठी 702 जागांवर मेगाभरती सुरु झाली आहे. विज्ञान शाखेतील  पदवीप्राप्त विद्यार्थांना आज, म्हणजेच 30 जुलै रात्री 12 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.  बीएससी (कृषी) (B.Sc , Agriculture)  किंवा बीएससी (उद्यानविद्या) (B.Sc Horticulture) या शाखांमधून शिक्षण घेतलेले उमेदवार अर्ज करू शकतात. तसेच यासाठी वयोमर्यादा 46 इतकी ठेवण्यात आली आहे.

जाणून घ्या सविस्तर

एकूण जागा : 702

पदाचे नाव : किसान मित्र

शैक्षणिक पात्रता: B.Sc (कृषी) किंवा B.Sc (उद्यानविद्या)

वयाची अट: 1 जुलै 2019 रोजी 21 ते 46 वर्षे.

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र.

परिक्षा शुल्क : फी नाही.

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 जुलै 2019

अधिक माहितीसाठी:  www.majhinaukri.in/sarthi-recruitment

इथं करा ऑनलाइन अर्ज:  https://sarthi-maharashtragov.in/

किसान मित्र या पदावर नियुक्ती झालेल्या उमेदवारांना शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी देण्यात येणार आहे. शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी विविध गावांमध्ये उमेदवारी नेमून दिली जाईल. त्या गावांतील शेतकऱ्यांना अधुनिक तंत्रज्ञान प्रचार, प्रसार, कृषीविषयक पायाभूत सुविधांची माहिती देण्यासोबतच ग्रामसभा घेताना विशेष भूमिका पार पाडावी लागणार आहे.