Sarkari Naukri: भारतीय डाक विभागातील महाराष्ट्र सर्कल मध्ये 3650 जागांच्या भरतीसाठी मुदतवाढ; आता 3 डिसेंबर पर्यंत करू शकाल appost.in वर अर्ज

याकरिता महाराष्ट्रभरातील तरूण आपले अर्ज दाखल करू शकतात.

India Post (Photo Credits: Twitter)

Maharahtra Circle Gramin Dak Sevaks Job Openings:  भारतीय डाक विभागातील महाराष्ट्र सर्कल मध्ये सुमारे 3650 पदांसाठी नोकर भरती जाहीर करण्यात आली आहे. दहावी पास महाराष्ट्रातील तरूणांसाठी सरकारी नोकरीची ही एक सुवर्णसंधी आहे. सुरूवातीला 30 नोव्हेंबर पर्यंत असलेली मुदत आता 3 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे इच्छुकांना अजूनही ऑनलाईन माध्यमातून अर्ज दाखल करण्याची सुवर्णसंधी आहे. भारतीय डाक विभगामध्ये ब्रांच पोस्ट मास्टर (BPM), असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM)आणि डाक सेवक या तीन पदांसाठी भरती होणार आहे. याकरिता महाराष्ट्रभरातील तरूण आपले  appost.in वर अर्ज दाखल करू शकतात.

भारतीय डाक विभागातील या नोकरीच्या संधीसाठी तरूणांना किमान 10 वी पास ही शैक्षणिक पात्रता आहे. तर वयोमर्यादेची पात्रता ही किमान 18 ते 40 वर्ष असणं आवश्यक आहे. SC/ST वर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेमध्ये 05 वर्षे सूट देण्यात आली आहे. तर OBC वर्गातील उमेदवारांना 03 वर्षे सूट देण्यात आली आहे.  इथे पहा महाराष्ट्र सर्कल मधील या नोकरभरतीचं अधिकृत नोटिफिकेशन. Sarkari Naukri: रेल्वेमध्ये 10वी पास, ITI केलेल्यांना नोकरीची संधी; 8 डिसेंबर पर्यंत करू शकता अर्ज

नोकरीचं ठिकाणं: महाराष्ट्र सर्कल

ऑनलाईन अर्ज कुठे कराल? appost.in 

वेतनश्रेणी: प्रत्येक पदानुसार वेतनश्रेणी वेगवेगळी आहे. मात्र किमान 10,000 ते 14,500 इतके वेतन देण्यात येणार आहे.

शुल्क: सामान्य वर्गातील उमेदवारांना 100 रूपये तर आरक्षित किंवा महिला उमेदवारांना कोणतेही शुल्क नसेल.

डाक विभागात नोकरभरतीचा अर्ज इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन सादर करणं अवश्यक आहे. यासाठी appost.in वर सुरूवातीला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून त्यानंतर ऑनलाईन माध्यमातूनच पैसे ट्रान्सफर केल्यानंतर इच्छुक पदासाठी अर्ज दाखल करण्यासाठी आवश्यक कागदपत्र अपलोड करायची आहेत. इच्छुकांना ऑफलाईन माध्यमातून पैसे भरण्यासाठी हेड पोस्ट ऑफिसमध्ये सोय करून देण्यात आलेली आहे.