Sardar Tara Singh Health Update: भाजपा नेते सरदार तारा सिंह यांची प्रकृती चिंताजनक मात्र स्थिर, मुंबईच्या लीलावती रूग्णालयात उपचार सुरू; किरीट सोमय्या यांची माहिती
तारा सिंह यांची प्रकृती चिंताजनक असली तरीही स्थिर आहे. त्यांच्यासाठी प्रार्थना करा असं आवाहन किरीट सौमय्या यांनी केलं आहे.
सोशल मीडियामध्ये मागील काही तासांपासून भाजपा नेते आणि माजी आमदार सरदार तारा सिंह यांच्या प्रकृतीबद्दल उलट सुलट चर्चांना उधाण आले होते. अशामध्ये आता भाजपा नेते किरीट सौमय्या (Kirit Somaiya) यांनी ट्वीटरच्या माध्यमातून तारा सिंह (Sardar Tara Singh) यांच्या प्रकृती बद्दल माहिती देत निधनाच्या अफवांना पूर्णविराम दिला आहे. तारा सिंह हे मुंबईच्या लीलावती रूग्णालयात (Lilavati Hospital) दाखल असून त्यांच्या उपचार सुरू आहेत. तारा सिंह यांची प्रकृती चिंताजनक असली तरीही स्थिर आहे. त्यांच्यासाठी प्रार्थना करा असं आवाहन किरीट सौमय्या यांनी केलं आहे.
काही वेळापूर्वीच किरीट सौमय्या यांनी तारा सिंह यांच्या कुटुंबाशी फोनवरून बातचित केली असल्याची माहिती दिली आहे. दरम्यान सरदार तारा सिंह यांच्या राजकीय कारकीर्दीला सुरूवात मुंबई महानगर पालिकेतून झाली होती. त्यांचा राजकीय प्रवास नगरसेवक ते आमदार असा राहिला आहे. Sardar Tara Singh Death Rumours: मुंबई भाजपा नेत्यांनी सरदार तारा सिंह यांच्या निधनाचा शोक संदेश शेअर केल्यानंतर ट्वीटस केले डिलिट.
किरीट सोमय्या ट्वीट
मागील वर्षी सरदार तारा सिंह यांचा मुलगा रणजित सिंह याला मुंबई पोलिसांनी पीएमसी बॅंक घोटाळा प्रकरणामध्ये अटक केली होती. सध्या सरदार तारा सिंह अक्टिव्ह राजकारणापासून दूर आहेत.