Tiktok Star Santosh Munde Dies: लाखो फॉलोअर्स असलेला टीक टॉक स्टार संतोष मुंडेचे विजेचा करंट लागून निधन

ही घटना मंगळवारी सायंकाळी 6:30 वाजताच्या सुमारास घडली. या घटनेने तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

Tiktok Star Santosh Munde Dies: लाखो फॉलोअर्स असलेला टीक टॉक स्टार संतोष मुंडेचे विजेचा करंट लागून निधन
Santosh Munde

Tiktok Star Santosh Munde Passes Away: भोगलवाडी (Bhogalwadi) येथील लाखो फॉलोअर्स असलेला टीक टॉक स्टार संतोष मुंडे (Tiktok Star Santosh Munde) व त्याच्या पुतण्याला विजेचा करंट (Electric current) लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. ही घटना मंगळवारी सायंकाळी 6:30 वाजताच्या सुमारास घडली. या घटनेने तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

सर्वांना हसवणारा एक कलाकार गेल्याचे दुःख सोशल मीडियात व्यक्त होत आहे. संतोष आज रडवून गेल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. याबाबतची अधिक माहिती अशी की, टीक टॉक स्टार संतोष मुंडे आणि त्याचा पुतण्या बाबुराव मुंडे हे दोघे विद्युत रोहित्रचे फ्यूज टाकण्यासाठी गेले होते. यावेळी या दोघांना वीजेचा जबर धक्का बसल्याने त्यांचा मृत्यू झाला. ही बातमी भोगलवाडी सह तालुक्यात पसरताच हळहळ व्यक्त केली जात आहे. हेही वाचा Mumbai: बीएमसीमध्ये पारदर्शकतेचा अभाव, 90 हून अधिक माजी नगरसेवकांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र

संतोष मुंडे यांचे सोशल मीडियावर मोठे फॉलोवर असून, या अपघाती निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. विविध कला सादर करून हसवणारा, बायकोने टीक टॉक स्टारला शेळी सांभाळायला लावलीय म्हणत हसवणारा, हसत हसत ग्रामीण जनतेच्या समस्या वेशीला टांगणारा, ग्रामीण व अस्सल माराठवाड्याच्या बोली भाषेतून आपल्या अभिनयाने खळखळून हसवणारा संतोष मुंडे लाखो फॉलोअर्स आणि चहात्यांना रडवून गेला. सर्वत दुःख व्यक्त केले जात आहे.

(The above story first appeared on LatestLY on Dec 14, 2022 12:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).