Sanjay Raut's Trendy Look: संजय राऊत यांचा ट्रेंडी लुक, MVA च्या महामोर्चाकडे वेधले लक्ष

या मोर्चात महाविकासआघाडीतील घटक पक्षांचे सर्व प्रमुख नेते उपस्थिती दर्शवणार आहेत. दरम्यान, या मोर्चात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचा हटके लूक लक्षवेधी ठरला आहे.

Sanjay Raut | (Photo Credit - Twitter)

Sanjay Raut's Trendy Look: छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj), महात्मा फुले (Mahatma Jyotiba Phule), सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून सातत्याने सातत्याने केल्या जाणाऱ्या अवमानकारक वक्तव्यांविरोधात महाविकासाघाडीकडून मुंबईत आज मोठा मोर्चा काढण्यात येत आहे. या मोर्चात महाविकासआघाडीतील घटक पक्षांचे सर्व प्रमुख नेते उपस्थिती दर्शवणार आहेत. दरम्यान, या मोर्चात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचा हटके लूक लक्षवेधी ठरला आहे.

महाविकासआघाडीच्या मुंबईतील मोर्चात शिवसेना (उद्धव ठाकरे) खासदार संजय राऊत निळा फेटा, निळी शाल आणि भगवे उपरणे अशा हटके लूकमध्ये पाहायला मिळाले. प्रसारमाध्यमांसमोर बोलताना संजय राऊत यांनी आपल्या नेहमीच्या स्टाईलनेच फटकेबाजी केली. मात्र, या वेळी फटकेबाजी पेक्षा अधिक चर्चा झाली ती संजय राऊत यांच्या हटके लूकची. राऊत यांचा लूक आपण येथेही पाहू शकतात. (हेही वाचा, Sanjay Raut on the State Government: 'त्यांच्या डोक्यात गांडुळाचा मेंदू, जो सतत वळवळत असतो'; संजय राऊत यांचा राज्य सरकारवर हल्लाबोल)

ट्विट

दरम्यान, संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना विद्यमान राज्य सरकारवर जोरदार टीका केली. संजय राऊत यांनी हल्लाबोल करत म्हटले की, खासदार यांनी राज्य सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. मुख्यमंत्री ठाण्यातून येतात आणि ठाणेच बंद ठेवतात. राज्याचा मुख्यमंत्रीची ठाणे बंद ठेवण्याचे आदेश देतो. सत्ताधारी लोक सरकारमध्ये असूनही बंद पाळतात. विशेष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले यांच्यासारख्या महाना पुरुषांचा अपमान होऊनही हे लोक बंद पाळत नाहीत. काहीतरी भलत्याच कारणास्तव बंद करतात. यांच्या डोक्यात गांडुळाचा मेंदू आहे. जो सतत वळवळत असतो, अशा शब्दात संजय राऊत यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif