Shiv Sena Dussehra Melava: शिवसेना दसरा मेळावा कसा होणार? संजय राऊत यांनी यांचे महत्त्वाचे विधान

शिवसेना (Shiv Sena) आणि दसरा मेळावा (Dussehra Melava) हे पाठिमागच्या अनेक वर्षांचे समिकरणच. यात कोरोना महामारीमुळे काहीसा खंड पडला. मात्र, यंदा पुन्हा दसरा मेळावा होणार आहे. खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिवसेना दसरा मेळावा (Shiv Sena Dussehra Melava) होणारच असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

Shiv Sena Dussehra Rally | (File Image)

शिवसेना (Shiv Sena) आणि दसरा मेळावा (Dussehra Melava) हे पाठिमागच्या अनेक वर्षांचे समिकरणच. यात कोरोना महामारीमुळे काहीसा खंड पडला. मात्र, यंदा पुन्हा दसरा मेळावा होणार आहे. खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिवसेना दसरा मेळावा (Shiv Sena Dussehra Melava) होणारच असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. यंदाचा दसरा मेळावा ऑनलाईन नाही तर प्रत्यक्ष होणार आहे. कोरोना नियमांचे पालन करुन दसरा मेळावा पार पडेल असेही संजय राऊत यांनी सांगितले. मात्र, दसरा मेळाव्याविशयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अंतिम निर्णय घेतील असेही राऊत म्हणाले.

संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दसरा मेळाव्याविषयी माहिती दिली. दरम्यान, राऊत यांनी लखीमपूर खेरी हिंसाचारावरुन (Lakhimpur Kheri Violence) उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) सरकार, भाजप आणि केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. 'उत्तरप्रदेशमध्ये जे घडले ते प. बंगाल, महाराष्ट्र, झारखंड, छत्तीसगढ, केरळात घडले असते तर त्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी भाजपाने देशभर आंदोलन पुकारले असते. प्रियंका गांधींना ज्याप्रमाणे अपमानित करून धक्के मारले हे भाजपाच्या महिला कार्यकर्त्यांच्या बाबतीत घडले असते तर महाराष्ट्रातील भाजपची महिला फौज फुगडय़ा घालत रस्त्यावर उतरली असती',असा टोलाही राऊत यांनी लगावला. (हेही वाचा, Shiv Sena On BJP: हा स्वातंत्र्याचा ‘रक्त महोत्सव’ म्हणायचा का? शिवसेनेचा भाजप सरकारला सवाल)

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात हे सर्व घडले आहे. शेतकऱ्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी अमूल्य योगदान दिले सरदार पटेलांच्या नेतृत्वाखाली ‘बार्डोलीचा सत्याग्रह’ का केला, हे शेतकऱ्यांना चिरडून मारणाऱ्यांनी समजून घेतले पाहिजे. गांधीजींनी मिठापासून परदेशी कपडय़ांपर्यंत केलेली आंदोलने शेतकऱ्यांच्याच बलिदानाने यशस्वी झाली. देशाच्या स्वातंत्र्यासाठी शेतकऱ्यांचीच पोरे शहीद झाली व आज देशाच्या सीमेवरही शेतकऱ्यांचीच पोरे मरत आहेत. त्या जवानांच्या कुटुंबांवर भरधाव गाडय़ा घालून मारण्याचे पाप सरकार करीत असेल तर ‘देश खतरे में है!’ असे मानावेच लागेल, असेही राऊत यांनी म्हटले.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now