Sanjay Raut on Kangana Ranaut: मुख्यमंत्र्यांचा Suite मिळावा, कंगनाची मागणी; संजय राऊतांची टीका

देशाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली असून 18 व्या लोकसभेचं हे अधिवेशन आहे. त्यानिमित्ताने सर्व नवनिर्वाचित खासदार हे सध्या दिल्लीत दाखल झाले आहेत.

Kangana Ranaut (PC - Instagram)

अभिनेत्री (Actress) आणि नवनिर्वाचित खासदार कंगना रणौत (Kangana Ranaut) हिने महाराष्ट्र सदनातील (Maharashtra Sadan, New Delhi) मुख्यमंत्री कक्षाची (CM Suite) मागणी केल्यानंतर आता विरोधकांकडून तिझ्यावर टीका ही होत आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे (Shiv Sena Uddhav Thackeray Camp) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी कंगना रणौतवर टीका केली आहे. कंगना रणौत हिमाचल प्रदेशमधून निवडून आली असल्याने तिच्या राहण्याची सोय हिमाचल भवनमध्ये करण्यात यावी, असे ट्विट राऊत यांनी केले आहे.

संजय राऊत यांनी एक्स मिडिया पोस्टमध्ये लिहिलं आहे की, ''बापरे! श्रीमतीजी हिमाचल प्रदेशातून निवडून आल्या आहेत. त्यांच्या निवासाची व्यवस्था हिमाचल भवन येथे व्हायला हवी. हिमाचल भवन येथे मुख्यमंत्री महोदयांचा खास कक्ष श्रीमतीजीना मिळत असेल तर काहीच हरकत नाही. महाराष्ट्राचे खासदार त्यांच्या हक्काच्या सदनात सिंगल खोलीत रहात आहेत श्रीमतीजी.''

पाहा पोस्ट -

देशाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली असून 18 व्या लोकसभेचं हे अधिवेशन आहे. त्यानिमित्ताने सर्व नवनिर्वाचित खासदार हे सध्या दिल्लीत दाखल झाले आहेत. हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेली अभिनेत्री कंगना रणौत ही देखील त्यानिमित्ताने दिल्लीत दाखल झाली. विशेष म्हणजे यावेळी तिने महाराष्ट्र सदनाला  पसंती दर्शवली होती.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement