Sanjay Raut On CM Bommai Statement: कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मईं यांचं जतबद्दलचं वक्तव्य हे छत्रपती शिवरायांच्या अपमान विसरण्यासाठी भाजपचं षडयंत्र, संजय राऊतांचा हल्लाबोल
दोन दिवसांपूर्वीचं महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला. त्यानंतर एका खासगी न्यूज चॅनच्या चॅट शोमध्ये भाजपचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी देखील शिवाजी महाराजांबाबत चुकीचे वक्तव्य केले. हे सगळं विसरण्यासाठी भाजपाने हा सिमावाद उखरुण काढल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
काल भल्या सकाळी उठून कर्नाटकाचे (Karnataka) मुख्यमंत्री बसवराज बोम्मईं (CM Basavaraj Bommai) यांनी जतवर कर्नाटकाचा दावा सांगितला. तोच राज्यभरात बोम्मईंच्या वक्तव्याचे पडसाद उमटताना दिसू लागले. विरोधकांसह सरकारमध्ये असलेल्या नेत्यांकडून विविध प्रतिक्रीया येवू लागल्या. महाराष्ट्रातील (Maharashtra) एक गाव देखील कुठेही जाणार नाही अशा प्रक्रिया ट्रेण्ड (Trend) करु लागल्या. राज्यभरात कर्नाटक सरकारचा (Karnataka Government) निषेध नोंदवला गेला. बेळगाव सिमाप्रश्ना पासून सुरु झालेला वाद जत पर्यत येवून पोहचल्याने राज्यात वातावरण चांगलंच तापलं. पण हे सगळं खरं नसुन केवळ भाजपाचं षडयंत्र असल्याची टीका शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली आहे. दोन दिवसांपूर्वीचं महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला. त्यानंतर एका खासगी न्यूज चॅनच्या चॅट शोमध्ये भाजपचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी (Sudhanshu Trivedi) यांनी देखील शिवाजी महाराजांबाबत चुकीचे वक्तव्य केले. हे सगळं विसरण्यासाठी भाजपाने हा सिमावाद उखरुण काढल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
काल सिमावादावरुन कर्नाटक सरकार (Karnataka Government) विरुध्द महाराष्ट्र सरकार (Maharashtra Government) असा सामना रंगला होता. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) महाराष्ट्राचे एकही गाव कर्नाटकला (Karnataka) देणार नाही असं खडसावून सांगितलं तर दुसऱ्या बाजूला बोम्माईंनी थेट सोलापूर (Solapur) आणि अक्कलकोटवर (Akkalkot) कर्नाटकचा दावा सांगितला. यानंतर पुन्हा एकदा सीमावादाचा प्रश्न चिघळला आहे. पण कर्नाटक आमि महाराष्ट्र दोन्ही राज्यात भाजपचं सरकार असल्याने ही केवळ छत्रपतींच्या अपमानास्पद वक्तव्याच्या विषयावरुन लक्ष भरकटण्यासाठी भाजपाचा डाव असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं. (हे ही वाचा:- Sanjay Raut Statement: निवडणूक आयोग तटस्थ असता तर शिवसेनेचे नाव आणि चिन्ह काढून घेतले नसते - संजय राऊत)
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल (Chhatrapati Shivaji Maharaj) आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) सध्या दिल्ली (Delhi) दौऱ्यावर आहेत. तर भाजप प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी देखील महाराजांच्या वक्तव्यानंतर कुठल्याही टेलिव्हीजन वाहिनीवर डिबेट शोसाठी दिसले नाही. भाजपने प्रकरण वळवणयासाठी सिमावादाचा प्रश्न पुढे केल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)