Sanjay Raut on the State Government: 'त्यांच्या डोक्यात गांडुळाचा मेंदू, जो सतत वळवळत असतो'; संजय राऊत यांचा राज्य सरकारवर हल्लाबोल
छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj), महात्मा फुले (Mahatma Jyotiba Phule) यांच्यासारख्या महाना पुरुषांचा अपमान होऊनही हे लोक बंद पाळत नाहीत. काहीतरी भलत्याच कारणास्तव बंद करतात. यांच्या डोक्यात गांडुळाचा मेंदू आहे. जो सतत वळवळत असतो, अशा शब्दात संजय राऊत यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला.
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (Shiv Sena) नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्य सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. मुख्यमंत्री ठाण्यातून येतात आणि ठाणेच बंद ठेवतात. राज्याचा मुख्यमंत्रीची ठाणे बंद ठेवण्याचे आदेश देतो. सत्ताधारी लोक सरकारमध्ये असूनही बंद पाळतात. विशेष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj), महात्मा फुले (Mahatma Jyotiba Phule) यांच्यासारख्या महाना पुरुषांचा अपमान होऊनही हे लोक बंद पाळत नाहीत. काहीतरी भलत्याच कारणास्तव बंद करतात. यांच्या डोक्यात गांडुळाचा मेंदू आहे. जो सतत वळवळत असतो, अशा शब्दात संजय राऊत यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला.
मुख्यमंत्री ठाण्यातून येतात. खरेतर त्यांची ताकद तेवढी आहे. केवळ ठाण्यातील वर्तकनगर आणि पाचपाखाडी वैगेरे. त्यांच्यात हिंमत असती तर त्यांनी छत्रपतींचा अवमान होताच महाराष्ट्र बंद केला असता. पण, त्यांनी तसे केले नाही. राज्याचा मुख्यमंत्रीच एखादे शहर बंद ठेवतो आणि गृहमंत्री ते केवळ पाहात बसतात, असा टोलाही संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना या वेळी लगावला. खरे तर केवळ सडक्या डोक्यातूनच हे विचार सूचत असतात असेही राऊत म्हणाले. (हेही वाचा, MVA Mumbai Morcha: महाविकासआघाडीचा महाविराट मोर्चा, मुंबईत आज विरोधकांचे जोरदार शक्तीप्रदर्शन)
दरम्यान, संजय राऊत यांनी पुढे म्हटले आजचा मोर्चा हा महाराष्ट्रावर प्रेम करणाऱ्या तमाम महाराष्ट्र प्रेमींचा आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री खुलेआम महाराष्ट्राला आव्हान देतात आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री चकार शब्द काढत नाहीत. ही अत्यंत धक्कादायक बाब आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री आगोदर विधाने करतात. तसेच, त्यांनी केलेले ट्विट हे आपण केलेच नाही, असे ते सांगतात. मुख्यमंत्र्यांच्या ट्विटर हँडलवरुन केले जाणारे ट्विट हे इतर कोण करते हे मुख्यमंत्र्यांनाच माहिती नसते. त्याचा खुलासा करायला त्यांना प्रदीर्घ काळ लागतो, हे सगळेच संताप आणणारे आहे असेही राऊत म्हणाले.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)