Sania Mirza to Marry Mohammed Shami? सानिया मिर्झा आणि मोहम्मद शमी संपर्कात असल्याचे टेनिसपटूच्या वडिलांकडून खंडण
सानिया मिर्जा आणि मोहम्मद शमी यांच्या कथीत स्नेहबंधांची प्रसारमाध्यमे आणि सोशल मीडियातून होणाऱ्या सर्व चर्चा म्हणजे केवळ अफवा आहेत. आपल्या कन्येच्या शमीसोबतच्या कथीत संबंधांबाबत येणाऱ्या सर्व बातम्या निराधार असल्याचे म्हणत सानियाच्या वडिलांनी वृत्ताचे जोरदार खंडण केले आहे. ते एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलत होते.
भारताची ख्यातनाम टेनिस स्टार सानिया मिर्झा (Sania Mirza) क्रिकेटपटू आणि क्रिकेटपटू मोहम्मद शमी (Mohammed Shami) परस्परांशी स्नेहबंधात आहेत, हे दोघे लवकरच विवाह करणार असल्याच्या चर्चा सध्या प्रसारमाध्यमे आणि सोशल मीडियावर जोरदार आहेत. दरम्यान, या सर्व चर्चा म्हणजे केवळ अफवा आहेत. आपल्या कन्येच्या शमीसोबतच्या कथीत संबंधांबाबत येणाऱ्या सर्व बातम्या निराधार असल्याचे म्हणत सानियाच्या वडिलांनी वृत्ताचे जोरदार खंडण केले आहे. ते एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलत होते.
ते छायाचित्र मॉर्फ
ऑनलाइन माध्यमात झपाट्याने पसरलेल्या अफवा, मोहम्मद शमी आणि सानिया मिर्झा यांना लग्नाच्या पोशाखात दाखविल्या जाणारी कथीत छायाचित्रे या सर्वांवरुन जोरदार खळबळ उडाली आहे. दरम्यान, ही सर्व छायाचित्रे मॉर्फ असल्याचे बोलले जात आहे. तसेच, सोशल मीडियात व्हायरल झालेली सर्व छायाचित्रेही मूळतः सानिया मिर्झाच्या 2010 मध्ये क्रिकेटपटू शोएब मलिकसोबतच्या लग्नातील आहे. ज्यामध्ये फेरफार करुन म्हणजेच फोटो मॉर्फ करुन शोएबच्या ठिकाणी शमीचा चेहरा लावण्यात आला आहे. (हेही वाचा, Sania Mirza Marrying Mohammed Shami: मोहम्मद शमीसोबत लग्न करणार सानिया मिर्झा? जाणून घ्या, माजी टेनिस स्टार आणि फास्ट बॉलरच्या लग्नाचे व्हायरल फोटो)
व्यक्तिगत जीवन प्रसारमाध्यमांपासून दूर
सानिया मिर्झा आणि शोएब यांच्यात नुकत्याच झालेल्या घटस्फोटची चर्चा सोशल मीडियात सुरु आहे. या चर्चेनंतर तिच्या आणि शमीबद्दलच्या चर्चाना उधान आले. दरम्यान, सानियाने अलिकडेच सोशल मीडियावर एक पोस्ट लिहीली. ज्यामध्ये तिने तिच्या हज यात्रेचा अनुभव सामायिक केला. तसेच, झालेल्या "चुकीबद्दल" क्षमा मागितली आणि तिच्या आयुष्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. दरम्यान, सानियाने तिचे वैयक्तिक आयुष्य नेहमीच लोकांच्या नजरेपासून दूर ठेवले आहे. मात्र, शोएब आणि तिचा घटस्फोट होऊन आता काही महिने झाले आहेत. अलिकडेच तिने शोएबला त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या! तिने म्हटले की, आम्ही सर्व चाहत्यांना आणि हितचिंतकांना विनंती करू इच्छितो की त्यांनी कोणत्याही अटकळीत गुंतून राहू नये. आमच्या वैयक्तीक आयुष्याचा आदर करावा, असेही तिने आपल्या निवेदनात म्हटले.
सानिया मिर्झाने 2010 मध्ये पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकशी लग्न केले. त्यांना इझान मिर्झा मलिक नावाचा मुलगा आहे, ज्याचा जन्म 2018 मध्ये झाला आहे. या जोडप्याचे सीमापार विवाह भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांत एक महत्त्वाचा मुद्दा आहे. सानिया मिर्झा ही भारतीय माध्यमांमधील एक प्रमुख व्यक्तिमत्त्व आहे, ती अनेकदा तिच्या क्रीडा यशासाठी आणि सांस्कृतिक प्रतीक म्हणून तिच्या भूमिकेसाठी प्रसारमाध्यमांच्या मथळ्यांचा विषय ठरते. महिलांचे हक्क आणि आरोग्य यासह विविध सामाजिक समस्यांसाठी त्यांनी तिच्या व्यासपीठाचा वापर केला आहे.
(The above story first appeared on LatestLY on Jun 21, 2024 03:39 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

