Sangali Crime News: बायकोने सासरी येण्यास नकार दिल्याने पतीने उचलेले टोकाचे पाऊल, सांगलीतील खळबळजनक घटना
सांगली शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. बायकोने सासरी येण्यास नकार दिल्याने पतीने रागाच्या भरात तीची हत्या करण्यात आली
Sangali Crime News: सांगली शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. बायकोने सासरी येण्यास नकार दिल्याने पतीने रागाच्या भरात तीची हत्या करण्यात आली. या प्रकरणा अंतर्गत मृत महिलेच्या आईने पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. आरोपी पती फरार असल्याची माहिती मिळाली आहे. पोलिस त्याचा शोधात आहे. या घटनेमुळे गावात मोठी खळबळ उडाली आहे. गुरुवारी महिला आपल्या माहेरी गेली होती. पतीने तीला सासरी येण्यास सांगितले परंतु तीनं नकार दिला. पतीने महिलेच्या माहेरी येऊन तीची हत्या केली.
मीडिया रिपोर्टनुसार, सांगलीतील वानलेसवाडी परिसरात सदाप्पा आणि शिल्पा रहिवासी आहे. सदाप्पा हा नेहमी दारू पियायचा. तो शिल्पाच्या चारित्र्यावर संशय करायचा. ज्यामुळे ती कंटाळून भांडण करून माहेरी आली. तीला माहेरातून सासरी येण्यास पतीने विनंती केली. गुरुवारी सदाप्पा तीला घेण्यास सासरी गेला. मात्र शिल्पाने त्याच्यासोबत जाण्यास नकार दिला. या गोष्टीचा राग मनात धरत सदाप्पाने तिच्या पोटात चाकू भोसकला, या घटनेत शिल्पाचा रक्तबंबाळ झाली. तीने जागीच प्राण सोडला.
मृत महिलेच्या आईने विश्रामबाग पोलिस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी येऊन पंचनामा केला. शिल्पाचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. आरोपी फरार आहे. आरोपीला पकडण्यासाठी पोलीसांनी पथक तयार केली आहे. या घटनेमुळे परिसरात शांतता पसरली आहे.
(The above story first appeared on LatestLY on Oct 28, 2023 12:00 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

