IPL Auction 2025 Live

Vasantdada Shetkari Sahakari Sakhar Karkhana: विशाल पाटील यांच्यासह वसंतदादा साखर कारखान्याच्या अध्यक्षांसह 16 संचालकांविरोधात गुन्हा दाखल

या कारवाईचा आणि दत्त इंडिया कंपनी यांचा काहीही संबंध नसल्याचे कंपनी व्यवस्थापकांनी म्हटले आहे

Vasantdada Shetkari Sahakari Sakhar Karkhana | (File Photo)

वसंतदादा साखर कारखाना (Vasantdada Shetkari Sahakari Sakhar Karkhana) अध्यक्षांसह एकूण 16 संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेली अनेक वर्षे कारखान्यातील विक्री केलेल्या मालांवर लागणारा मूल्यवर्धित कर (VAT) न भरल्याने ही कारवाई करण्यात आली. थकीत राहिलेला कर साधारण 12 कोटी 44 लाख इतक्या रकमेचा आहे. सांगली येथील संजयनगर पोलीस ठाणे येथे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जीएसटी उपायुक्त शर्मिला विनय मिस्कीन यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरुन हा गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईचा आणि दत्त इंडिया कंपनी यांचा काहीही संबंध नसल्याचे कंपनी व्यवस्थापकांनी म्हटले आहे.

दत्त इंडिया कंपनी आणि वसंतदादा साखर कारखाना यांचा संबंध काय असा सवाल अनेकांना पडला असेल. या प्रश्नाचे उत्तर असे की सप्टेंबर 2017 मध्ये श्री दत्त इंडिया कंपनीने हा कारखाना चालवण्यास घेतला आहे. पुढे वसंतदादा कारखान्यावरुन कंट्री लिकर उत्पादन करण्या आले. या वेळी व्यापाऱ्यांकडून 35% मुल्यवर्धीत कर व्यापाऱ्यांकडून भरुन घेतला. मात्र, हा कर कारखान्याने शासनाच्या तिजोरीत भरलाच नाही. उलट तो स्वत:कडेच ठेवला. त्यामुळे हा कर साधारण 2017 ते 2021 या काळात थकीत राहिल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

गुन्हा दाखल करण्यात आलेले संचालक

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, वसंतदादा कारखान्याकडून 9 कोटी 8 लाख 35 हजार 647 इतका कर थकीत राहिला. त्यावर व्याजाची रक्कम 3 कोटी 36 लाख 18 हजार 304 इतके झाले. कर रुपात एकूण रक्कम 12 कोटी 44 लाख 53 हजार 951 इतकी रक्कम थकीत राहिली. कारखान्याने मूल्यवर्दीत कराची ही रक्कम सरकारकडे जमा केली नाही. त्यामुळे . जीएसटी उपायुक्त शर्मिला विनय मिस्कीन यांनी पोलिसांत तक्रार दिली होती. या तक्रारीनंतर वसंतदादा साखर कारखान्याचे अध्यक्षसह 16 संचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आले.

तक्रारीनंतर सांगलीतील संजयनगर पोलीस स्टेशन मध्ये वसंतदादा साखर कारखान्याचे अध्यक्षसह 16 संचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झालेल्या मध्ये वसंतदादा साखर कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांच्यासह 16 संचालकांचा समावेश आहे. संभाजी मेंढे, मंगल पाटील, शिवाजी पाटील, संपत माने, रणजितसिंह पाटील, सुरेश पाटील, सुनील आवटी, अमित पाटील, यशवंतराव पाटील, अशोक अनुगडे, महावीर पाटील, विक्रमसिंह पाटील, दौलतराव शिंदे, अण्णासाहेब पाटील, जिनेश्वर पाटील अशी गुन्हा दाखल झालेल्या संचालकाची नावे आहेत.