Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याच्या लोकार्पणास दिवाळीचा मुहूर्त

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्य पहिल्या टप्प्याचं उद्धाटन दिवाळीत होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Highways Image used for representational purpose | (Photo Credits: File Photo)

बहूचर्चित समृद्धी महामार्गाच्या (Samruddhi Mahamarg) लोकार्पणाची वाट फक्त नागपूर (Nagpur) किंवा मुंबईकरचं (Mumbai) नाही तर संपूर्ण देश पाहत आहे. कारण या मार्गाद्वारे एक लांब अंतर अगदीच कमी वेळात पार पाडता येणार आहे. मुंबई-छत्तीसगढ (Chhattisgarh) किंवा मुंबई-मध्य प्रदेश (Madhya Pradesh) या मार्गावरील वाहतूक सुध्दा आता या महामार्गाच्या माध्यमातून अगदी जलद गतीने होणार आहे. मुंबई-नागपूर (Mumbai-Nagpur) समृद्धी महामार्गाच्या (Mumbai Nagpur Samruddhi Mahamarg) पहिल्या टप्प्याचं उद्धाटन दिवाळीत होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.  नागपूर ते शिर्डी (Nagpur-Shirdi) पर्यंतचा समृद्धी महामार्गाचा पहिला टप्प्याचं काम पूर्ण झालं आहे. तरी या पहिल्या टप्प्याच्या उद्धाटनास देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (PM Modi) नागपूरात (Nagpur) हजेरी लावण्याची चर्चा आहे.

 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy CM Devendra Fadnavis) यांचा महाराष्ट्राची राजधानी आणि उपराजधानीला जोडणारा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या महामार्गाचं उद्घाटन 15 ऑगस्ट ला होणार अशी चर्चा होती पण आता जवळजवळ दिवाळीचा मुहूर्त ठरल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. . नागपूर (Nagpur)- मुंबई (Mumbai) दरम्यान रहदारी सुलभ व्हावी या उद्देशानं 31 जुलै 2015 रोजी 701 किलोमीटरच्या 'समृद्धी महामार्गाची' घोषणा विधानसभेत देवेंद्र फडणवीसांनी केली होती. राज्याच्या 10 जिल्ह्यातून जरी हा महामार्ग जात असला तरी एकूण 24 जिल्ह्यांना या महामार्गाचा फायदा होणार आहे. (हे ही वाचा:- Shirdi Sai Mandir: शिर्डी संस्थांनात नवे विश्वस्त मंडळ नियुक्त करण्याचे औरंगाबाद खंडपीठाचे आदेश)

 

समृद्धी महामार्ग (Samruddhi Mahamarg) टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मराठवाडा (Marathwada)-विदर्भाच्या (Vidarbha) विकासाला आणि वाहतूक, दळणवळण, उद्योग, व्यापार यांना चालना देणारा तसेच असंख्य प्रमाणात रोजगाराची (Employment) संधी उपलब्ध करुन देणारा प्रकल्प असल्याचं सांगितलं जातं. सध्या मुंबई ते नागपूर (Mumbai-Nagpur) अंतर कापण्यास सुमारे 14 तास लागतात. जवळपास 812 किमी अंतर पडते. जर समृद्धी महामार्ग झाल्यास अंतर 700 किमी होईल आणि फक्त 8 तासात मुंबई (Mumbai) ते नागपूर (Nagpur) अंतर कापणे शक्य होईल अशी माहिती एमएसआरडीसी कडून देण्यात आली आहे.