Samriddhi Highway Accident: ट्रक आणि ट्रॅव्हल्सच्या धडकेत समृध्दी महामार्गावर भीषण अपघात, दहा जण दगावले, बचाव कार्य सुरु

समृध्दी महामार्गावर ट्रक आणि ट्रॅव्हल्सच्या धडकेत भीषण अपघात झाला आहे.या अपघातात दहा जणांता मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

Samriddhi Highway Accident: ट्रक आणि ट्रॅव्हल्सच्या धडकेत समृध्दी महामार्गावर भीषण अपघात, दहा जण दगावले, बचाव कार्य सुरु
Samruddhi Mahamarg, Accident (PC - ANI/File Photo)

Samriddhi Highway Accident: समृध्दी महामार्गावर ट्रक आणि ट्रॅव्हल्सच्या धडकेत भीषण अपघात झाला आहे.या अपघातात दहा जणांता मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. समृध्दी महामार्गाच्या वैजापूर येथली जांबरगाव टोल नाक्याजवळ ही घटना घडली. रात्रीच्या दीडच्या सुमारास हा अपघात झाला. स्थानिकांना या अपघाताची माहिती मिळताच, घटनास्थळी बचाव कार्यासाठी धाव घेतला. सैलानी येथील दर्गाला जाणाऱ्या भाविकांच्या वाहनाचा हा अपघात झाला. ट्रव्हल्स बसने ट्रकला मागून जोरात धडक दिली.

काल रात्री एकच्या सुमारास, समृध्दी महामार्गावर जांबरगाव टोलनाक्याजवळ एक ट्रॅव्हल्स बस ट्रकच्या मागून जोरदार धडकल्याने भीषण अपघात झाला. ट्रॅव्हल्स बसमधील प्रवासी बुलढाणा जिल्ह्यातील सैलानी बाबा येथील दर्ग्याचे दर्शन घेऊन परत जात असतांना त्यांच्या वाहनाचा अपघात झाला आहे. या अपघातात काही  लहान मुलाचा देखील मृत्यू झाला आहे. भीषण अपघातामुळे बसचा समोरील भाग चेंदामेंदा झाला आहे. सर्व प्रवाशी नाशिक जिल्ह्यातील असल्याची माहिती समोर येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बसमध्ये ३० प्रवाशी प्रवास करत होते. अपघाताची माहिती मिळताच, स्थानिक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बचावकार्य सुरु केले. मृतांमध्ये लहान मुलांचा समावेश होता. अपघातग्रस्तांना तात्काळ मदत करण्यात आली. सर्व जखमींना रुग्णवाहिकेतून शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.वैजापूर पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली.

(The above story first appeared on LatestLY on Oct 15, 2023 07:42 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).