NCP Mumbai President: अजित पवार यांची रणनीती; समीर भुजबळ यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षपदी नियुक्ती

तसेच समीर भुजबळ यांनी बॅकस्टेजवर राहून पक्षाच्या सर्व कामाची जबाबदारी पार पाडली. दरम्यान, समीर भुजबळ यांनी या पदाची जबाबदारी सक्षमपणे पार पाडू, असा विश्वास व्यक्त केला आहे.

Sameer Bhujbal (PC - Facebook)

NCP Mumbai President: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) नेते समीर भुजबळ (Sameer Bhujbal) यांची बुधवारी पक्षाच्या मुंबई प्रदेशाध्यक्षपदी (Mumbai President) नियुक्ती करण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), खासदार प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत समीर भुजबळ यांना मुंबई अध्यक्षपदाचे नियुक्ती पत्र देण्यात आले. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर समीर भुजबळ यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुंबई प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती महत्त्वपूर्ण ठरू शकते.

यासंदर्भात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसच्या उभारणीत मंत्री छगन भुजबळ यांचे मोठे योगदान आहे. तसेच समीर भुजबळ यांनी बॅकस्टेजवर राहून पक्षाच्या सर्व कामाची जबाबदारी पार पाडली. दरम्यान, समीर भुजबळ यांनी या पदाची जबाबदारी सक्षमपणे पार पाडू, असा विश्वास व्यक्त केला आहे. (हेही वाचा - Kirit Somaiya Receives Threat: किरीट सोमय्या यांना व्हिडिओ उघड करण्याची धमकी देणारा आणखी एक ई-मेल; पोलिसांकडून तपास सुरू)

अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं की, मुंबई शहराला समीर भुजबळसारख्या कुशल नेतृत्वाची गरज आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेत मंत्री छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. समीर भुजबळ मुंबईतील पक्षाचे जाळे विस्तारण्यासाठी यशस्वीपणे काम करतील, असंही यावेळी प्रफुल्ल पटेल म्हणाले.

मुंबई शहराची आजवर पक्षाकडून उपेक्षा झाली आहे. मुंबईचा भविष्यात गांभीर्याने विचार करावा लागणार आहे. नाशिकप्रमाणेच समीर भुजबळ यांचा मुंबई शहराचा गाढा अभ्यास असून, त्यांच्या कार्यक्षमतेमुळे त्यांच्यावर मुंबईची जबाबदारी पेलली आहे, असंही पटेल यांनी यावेळी नमूद केलं.