Sambhajiraje Chhatrapati: संभाजीराजे छत्रपती शिवबंधनात अडकणार? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज पुन्हा घेणार भेट

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी (Rajya Sabha Election 2020) संभाजीराजे मैदानात अपक्ष उतरले आहेत. मात्र, संख्याबळ पाहता ही जागा महाविकासआघाडी सहज जिंकू शकते अशी स्थिती आहे.

Sambhajiraje Chhatrapati | (Photo Credit - Social Media)

संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांची आज (23 मे) पुन्हा एकदा भेट घेणार आहेत. राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी (Rajya Sabha Election 2020) संभाजीराजे मैदानात अपक्ष उतरले आहेत. मात्र, संख्याबळ पाहता ही जागा महाविकासआघाडी सहज जिंकू शकते अशी स्थिती आहे. महाविकासआघाडीकडून या जागेवर शिवसेनेने दावा सांगितला आहे. त्यामुळे संभाजीराजे आता आपल्या भूमिकेवर ठाम राहात अपक्षच निवडणूक लढणार की शिवबंधन बांधत शिवसेना (Shiv Sena) प्रवेश करणार? याबाबत उत्सुकता आहे. संभाजीराजे छत्रपतींनी शिवसेनेत प्रवेश केल्यास त्यांची उमेदवारी जाहीर करु असे शिवसेनेने आगोदरच स्पष्ट केले आहे.

संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभा निवडणुकीसाठी शिवसेना पक्षात प्रवेश करायला या आधी नकार दिला आहे. त्यामुळे आता संभाजीराजे पुन्हा नव्याने काय निर्णय घेणार याबाबत उत्सुकता आहे. संभाजीराजे हे मराठा मोर्चाच्या सर्व समन्वयकांशी चर्चा करणारुन निर्णय घेणार असल्याचे समजते. त्यामुळे आज मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवसेनेने म्हटले आहे की, संभाजीराजे छत्रपती यांनी शिवसेनेत प्रवेश केला तर लगेचच त्यांची उमेदवारी जाहीर केली जाईल. याबाबत शिवसेना खासदार संजय राूत यांनी संभाजीराजे छत्रपती यांना फोनवरुन ऑफर दिली. मात्र, संभाजीराजे यांनी ही ऑफर नाकारल्याचे समजते. (हेही वाचा, RS Elections 2022: संभाजीराजे छत्रपती यांनी शिवसेनेची अधिकृत उमेदवारी स्विकारून राज्यसभेवर जावं; सेनेची पहिल्यांदा खुली ऑफर)

संभाजीराजे छत्रपती यांनी शिवसेनेची ऑफर नाकारली असली तरी मराठा मोर्चाच्या सर्व समन्वयकांशी चर्चा करुन ते निर्णय घेणार असल्याचे समजते. मराठा मोर्चाच्या समन्वयकांनीही शरद पवार यांची भेट घेतली होती. या भेटीत त्यांनी संभाजीराजे छत्रपती यांच्या उमेदवारीला पाठिंबा द्यावा अशी मागणी केली होती. त्यामुळे 10 जून रोजी पार पडणाऱ्या निवडणुकीत शिवसेना राज्यसभेचे तिकीट कोणाला देते आणि संभाजीराजे आपला उमेदवारी अर्ज कसा दाखल करतात याबाबत उत्सुकता आहे.