नरेंद्र मोदी यांच्या विधानावर संभाजी भिडे यांची प्रतिक्रीया; म्हणाले, भारताला बुद्ध नव्हे छत्रपती संभाजी महाराज पाहिजेत

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी संयुक्त राष्ट्र संघ (United Nation) महासभेत भारताने (India) जगाला युद्ध नव्हे तर बुद्ध दिला आहे, असे विधान केले होते.

Sambhaji Bhide (Photo Credits: Twitter)

नवरात्र (Navratri) उत्सवानिमित्त एका कार्यक्रमात शिवप्रतिष्ठानचे (Shivpratishthan) संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांच्या वक्तव्याने नव्या वादाला आमंत्रण दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी संयुक्त राष्ट्र संघ (United Nation) महासभेत भारताने (India) जगाला युद्ध नव्हे तर बुद्ध दिला आहे, असे विधान केले होते. नरेंद्र मोदी यांच्या ह्यूस्टन (Houston) येथील भाषणावर भिडे यांनी आक्षेप घेतला आहे. पंतप्रधान मोदी चुकीचे बोलले असून देशाने जगाला बुद्ध दिला, पण बुद्ध उपयोगाचा नाही. तसेच विश्वाचा संसार चालवण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजच पाहिजेत, असे कार्यक्रम दरम्यान म्हणाले आहेत.

संभाजी भिडे नवरात्र उत्सवानिमित्त काढण्यात येणाऱ्या सांगलीतील श्री दुर्गामाता दौडीमध्ये सहभागी झाले होते. त्यावेळी ते बोलत होते. नरेंद्र मोदी यांच्या विधानावर भिडे यांनी बोट दाखवत म्हणाले की, "पंतप्रधान मोदी हे चुकीचे बोलले आहेत. ती चूक महाराष्ट्र दुरुस्त करु शकतो. ते काम आपले आहे. देशाने जगाला बुद्ध दिला. पण बुद्धाचा उपयोग नाही. विश्वाचा संसार चालवण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजच पाहिजेत". असे ते बोलत होते. हे देखील वाचा- भाजप आमदार चरण वाघमारे यांना महिला पोलिसाशी गैरवर्तणूक केल्याप्रकरणी अटक

नरेंद्र मोदी काय म्हणाले होते?

पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात पाकिस्तानवर निशाणा साधताना बुद्धांचा उल्लेख केला होता. त्यावेळी मोदी म्हणाले की, भारताने जगाला बुद्ध दिला. भारत जगभरात नेहमीच एकजुटीचा आणि शांतीचा संदेश देत आला आहे. यावेळी मोदींनी महात्मा गांधी, स्वामी विवेकानंद याच्या विचारांचा उल्लेख आवर्जुन केला होता.