Sambhaji Bhide: संभाजी भिंडे यांच्या विरोधारात पुण्यात गुन्हा दाखल, जाणून घ्या काय आहे प्रकरण?

पुण्यातील लोणीकंद पोलीस ठाण्यात शिवप्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे यांच्यासह 150 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Sambhaji Bhide (PC - Facebook)

महापुरुषांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याने अडचणीत आलेले शिवप्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे यांच्या अडचणीत आता पुन्हा वाढ झाली आहे. पुणे शहरात संभाजी भिडे यांच्यासह 150 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परवानगी नाकारल्यानंतरही मार्गदर्शन बैठक घेतल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोणीकंद पोलिसांनी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पुण्यातील लोणीकंद पोलीस ठाण्यात शिवप्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे यांच्यासह 150 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  (हेही वाचा - Mumbai Crime: मुंबईतील फ्लॅटमध्ये एअर होस्टेसचा मृतदेह सापडला, क्लिनरला अटक)

पोलिसांनी दिलेले आदेश झुगारने संभाजी भीडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना महागात पडले आहे. पुण्यातील लोणीकंद पोलीस ठाण्यात शिवप्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे यांच्यासह 150 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परवानगी नाकारल्यानंतरही मार्गदर्शन बैठक घेण्यात आली आहे. संभाजी भिडे यांनी नगर रस्त्यावरील मांजरी कोलवडी गावात माऊली लॉन्स येथे शनिवारी सभा आयोजित केली होती.

पोलिसांनी या सभेप्रकरणी संभाजी भिडे, राजेंद्र आव्हाळे, बाळासाहेब नेवाळे, राहुल उंद्रे यांच्यासह 150 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती, त्यावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.