'समर्थ रामदास शिवाजी महाराजांचे गुरु नाहीत' शरद पवार यांना खोडला योगी आदित्यनाथ यांचा दावा
शिवाजी महाराजांचं स्वत:चं कर्तृत्व, जिजाऊंचे मार्गदर्शन यामुळे सगळा इतिहास घडला, हे सगळ्या जगाला माहिती आहे, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.
आज पुण्यात आलेल्या यूपी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी भाषणादरम्यान महाराष्ट्राच्या भूमीचं कौतुक करताना 'भक्तीच्या शक्तीनेच शूत्रचा सामना करण्याचं बळ मिळतं' असं म्हणताना शिवरायांना रामदास स्वामींनी दिलेल्या संस्कारांमधून त्यांनी पुढे पराक्रम घडवला असं म्हटलं. मात्र त्यांच्या या वक्तव्यामध्ये समर्थ रामदास स्वामी त्यांचे मार्गदर्शक होते हा दावा शरद पवारांनी खोडून काढला आहे. 'काही लोक वेगळी भूमिका मांडण्याचा प्रयत्न करत आहेत. जिजाऊ याच शिवरायांच्या मार्गदर्शक होत्या.' असं ते म्हणाले आहेत.
योगी आदित्यनाथ आज आळंदीमध्ये बोलता असताना त्यांनी 'समर्थ रामदास स्वामींच्या मार्गदर्शनामुळे शिवरायांना पुढील कार्य करता आले' या योगींच्या दाव्याबद्दल विचारण्यात आले तेव्हा 'आमच्यादृष्टीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वामध्ये राजमाता जिजाऊ यांचे योगदान आहे. जिजाऊंनी शिवाजी महाराजांच्या आयुष्याला दिशा दिली. पण जिजाऊंनी केलेले कर्तृत्त्व बाजुला सारुन त्याचे श्रेय आणखी कोणाला देण्याची भूमिका काही लोक घेत आहेत. पण शिवाजी महाराजांचं स्वत:चं कर्तृत्व, जिजाऊंचे मार्गदर्शन यामुळे सगळा इतिहास घडला, हे सगळ्या जगाला माहिती आहे, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. CM Yogi Adityanath In Pune: योगी आदित्यनाथ पुण्यात; 'भक्तीतून मिळणारी शक्तीच ...' (Watch Video)
पहा काय म्हणाले योगी आदित्यनाथ?
दरम्यान आज पुण्यात योगी आदित्यनाथ यांनी गीता- भक्ती अमृत महोत्सवाला भेट दिली. या कार्यक्रमाला स्वामी श्री गोविंददेव गिरी महाराज, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील होते.