Family Planning: राज्य सरकारच्या कुटुंब नियोजन किटमध्ये रबरी लिंग; आशा वर्कर, सामाजिक कार्यकर्त्यांकडून नाराजी
राज्य सरकारकडून (Maharashtra Government) आशा वर्कर्सना कुटुंब नियोजन उपक्रमाची माहिती देण्याठी एक किट दिले जाते. ज्याद्वारे या आशा वर्कर्स सरकारच्या उपक्रमाची माहिती तळागाळात पोहोचवतात.
गावखेड्यांमध्ये कुटुंब नियोजन (Family Planning) संदेश पोहोचविणाऱ्या महाराष्ट्रातील आशा वर्कर (Asha Worker) सध्या काहीशा नाराज आहेत. राज्य सरकारकडून (Maharashtra Government) आशा वर्कर्सना कुटुंब नियोजन उपक्रमाची माहिती देण्याठी एक किट दिले जाते. ज्याद्वारे या आशा वर्कर्स सरकारच्या उपक्रमाची माहिती तळागाळात पोहोचवतात. या कुटुंबनियोजन किटमध्ये चक्क रबरी लिंग देण्यात आल्याची माहिती पुढे येत आहे. त्यामुळे रबरी लिंग असलेले किट घेऊन लोकांमध्ये जायचे तरी कसे आणि लोकांना माहिती द्यायची तरी कशी असा प्रश्न आशा वर्कर्सना सतावतो आहे. राज्य सरकारच्या या किटबाबत अनेक आशा वर्कर्स आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून आता नाराजी व्यक्त केली जात आहे.
राज्य सरकारकडून मिळालेले कुटुंब नियोजन किट घेऊन आशा वर्कर्सना नागरिकांमध्ये जायचे आहे व त्यांना प्रात्यक्षीक दाखवायचे आहे. आपली एकूण सामाजिक मानसिकता लक्षात घेता आजही आपल्याकडे लैंगिक विषयांवर उघडपणे बोलले जात नाही. त्यामुळे अशा समाजात रबरी लिंग असलेले किट घेऊन जायचे कसे आणि त्यांना प्रात्यक्षीक दाखवायचे तरी कसे हा प्रश्न या आशा वर्कर्स समोर उभा राहिला आहे. (हेही वाचा, Udayanraje Bhosale on Corona Vaccine: भारतातील नागरिकांनी फॅमिली प्लॅनिंग केलं असतं तर आज कोरोना लसींचा साठा कमी पडला नसता - उदयनराजे भोसले)
लोकसंख्या वाढ नियंत्रणात ठेवण्यासठी राज्य सरकार अनेक उपक्रम राबवते. राज्याचा सर्वजनिक आरोग्य विभाग हा उपक्रम राबवतो. त्यासाठी कुटुंब नियोजन उपक्रम राबवते. त्यासाठी आवश्यक साधनसामग्री उपलब्ध करुन दिली जाते. कुटुंब नियोजन किटही त्याचाच एक भाग आहे. त्यामुळे आता हे किट घेऊन फिरायचे कसे आणि माहिती तरी द्यायची कशी हा प्रश्न तळागाळात काम करणाऱ्या आशा वर्कर्सना पडला आहे.