Big Theft In Yavatmal: यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील जंगलात राहणाऱ्या एका शेतकरी कुटुंबाच्या घरात चोरट्यांनी सशस्त्र दरोडा टाकला आहे. चाकू आणि बंदूकीची धाक दाखवत चोरट्यांनी घरातून 30 लाख रुपये आणि 20 तोळे सोन्यांची चोरी केली आहे. चोरट्यांनी कुटुंबावर प्राणघातल हल्ला केला. चोरी करून चोरटे फरार झाले आहे. या घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली आहे. चोरीच्या वेळीस घरात तीन ते चार जण उपस्थित होते. (हेही वाचा- विहिरीत पोहायला गेलेल्या दोन तरुणाचा बूडून मृत्यू , नांदेड येथील घटना)