Riteish Deshmukh And Genelia Deshmukh: रितेश-जिनिलियाच्या कंपनीला महिन्याभरातच 120 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर? 10 दिवसात लातूर एमआयडीसीत भूखंड मिळाल्या प्रकरणी भाजपचा देशमुख दामपत्यावर निशाणा
एकशे वीस कोटी ही काही छोटी रक्कम नसून एवढ्या मोठ्या कर्जाला महिनाभरात लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कोणत्या निकषावर हे कर्ज मंजूर केला असा सवाल भाजपकडून विचारण्यात आला आहे.
अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि पत्नी जेनिलीया देशमुख (Genelia D'souza) हे फक्त सिनेकलाकार नसुन उद्योजक दामपत्यही आहेत. मुंबई (Mumbai)-लातुर (Latur) या शहरात त्यांचा विस्तार वाढवण्याचा मानस आहे. संबंधीत व्यवसायाबाबत लातूर एमआयडीसीत भूखंड मंजूर करण्यात आला. गेले तीन वर्षापासून भुखंडासाठी प्रतिक्षेत असलेले अजूनही वेटींग लिस्टमध्येच (Waiting List) आहे. पण रितेश जेनिलियाच्या व्यसायाचा भुखंड मात्र केवळ 10 दिवसांत मंजूर करण्यात आला. तर रितेश-जिनिलीयाला ही विशेष वागणूक का असा सवाल लातूर भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी पत्रकार परिषद (Press Conference) दरम्यान विचारला आहे. एवढचं नाही तर रितेश-जिनिलिया हे दोघं सिनेअभिनेते आहेत म्हणून की या दोघांनाही राजकीय पार्श्वभुमी असल्याने ही सवलत देण्यात आली असा सवाल आता उपस्थित होत आहे.
एवढचं नाही तर रितेश जिनिलीयाच्या व्यसायासाठी फक्त महिनाभरातचं 120 कोटी रुपयांचे कर्जही मंजूर झालं आहे. एकशे वीस कोटी ही काही छोटी रक्कम नसून एवढ्या मोठ्या कर्जाला महिनाभरात लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कोणत्या निकषावर हे कर्ज मंजूर केला असा सवाल भाजपकडून (BJP) विचारण्यात आला आहे. या कंपनीवर आता लातूर बँकेने आक्षेप घेतले आहेत. (हे ही वाचा:- Ajit Pawar: विरोधीपक्ष नेते अजित पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या भेटीला, या खास भेटीत दडलयं का? राजकीय वर्तुळात मोठी चर्चा)
रितेश जिनिलीयाच्या या कंपनीचं नाव - देश अग्रो प्रा लिमिटेड ((Desh Agro Private Ltd) असे आहे. गेल्या वर्षीचं या कंपनीची सुरुवात झाली होती. रितेश विलासराव देशमुख आणि जिनिलिया रितेश देशमुख हे दामपत्य या कंपनीत प्रत्येकी ५० टक्क्यांचे मालक आहेत. सोळा लोकांचा प्राधान्यक्रमाला बाजूला सारत भूखंड मंजूर करण्यात देशमुख दामपत्या झुकते माप का असा सवाल भाजपने उपस्थित केला आहे.