#Video: रिंकू राजगुरू ने सैराट स्टाईल मध्ये दिला कोरोना पासून बचावाचा सल्ला; पुणे पोलिसांनी शेअर केलेला हा व्हिडीओ नक्की पहा

पण जर का कोणी विसरले असेल तर त्यांना आपल्या सैराट (Sairat) स्टाईल मध्ये आठवण करून देण्यासाठी आर्ची म्हणजेच अभिनेत्री रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) हिने पुणे पोलिसांच्या (Pune Police) सोबत मिळून एक व्हिडीओ बनवला आहे.

Rinku Rajguru In Pune Police Video (Photo Credits: Screengrab Twitter)

कोरोना व्हायरस (Coronavirus) पासून बचावासाठी काय करावं काय करू नये हे आतापर्यंत सर्वांनाच माहीत असणे अपेक्षित आहे. पण जर का कोणी विसरले असेल तर त्यांना आपल्या सैराट (Sairat) स्टाईल मध्ये आठवण करून देण्यासाठी आर्ची म्हणजेच अभिनेत्री रिंकू राजगुरू (Rinku Rajguru)  हिने पुणे पोलिसांच्या (Pune Police) सोबत मिळून एक व्हिडीओ बनवला आहे. या मध्ये मराठी आणि इंग्रजी मध्ये रिंकू सर्वांना मास्क घालण्याचा सल्ला देत आहे. पुणे पोलीस मुख्य आयुक्तांच्या ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. कोरोना व्हायरसचा प्रसार सुरु झाल्यापासून दोन गोष्टींना विशेष प्राधान्य दिले जाते ते म्हणजे सोशल डिस्टंसिंग (Social Distancing) आणि मास्कचा (Mask) वापर. आपल्याला आपल्यासोबतच इतरांची सुद्धा काळजी घ्यायची आहे त्यामुळे या गोष्टींकडे चुकूनही कानाडोळा करू नका असे या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे.हेदेखील वाचा- COVID-19 वर मात करण्यासाठी शिवणयंत्राशिवाय कपड्याचा वापर करुन घरच्या घरी मास्क कसा बनवाल? पाहा सोप्या ट्रिक्स

आजवर समोर आलेय काही प्रसंगात, निष्काळजी रुग्णांमुळे कोरोना आणखीन पसरल्याचे आपण पाहिले आहे. हे वागणे केव्हा स्वतःसाठी नाही तर आपल्या आजूबाजूच्या प्रत्येकासाठी घातक आहे. असे करू नये हा सल्ला रिंकूने व्हिडीओ मध्ये दिला आहे. अर्थात आपल्या नेहमीच्या अंदाजात रिंकू ने जवळजवळ असा दमच भरला आहे म्हंटले तरी वावगं ठरणार नाही, काय आहे का व्हिडीओ प्रत्यक्षच पहा. How to Wear Mask: वैद्यकिय मास्क घालताना काय काळजी घ्याल?

पुणे पोलीस ट्विट

दरम्यान, महाराष्ट्रात मुंबईच्या पाठोपाठ कोरोना रुग्णाच्या सर्वाधिक संख्येत पुणे शहर व जिल्ह्याचा क्रमांक लागतो. पुण्यात सध्या कोरोनाचे 12184 रुग्ण आढळले असून यापैकी 480 जणांचा आजवर कोरोनाने बळी घेतला आहे तर 6750 जण हे कोरोनावर मात करून आपापल्या घरी सुखरूप परतले आहेत.