Boat Capsizes In Savitri River: पोलादपूरजवळील सावित्री नदीत बचाव पथकाची बोट उलटली; थोडक्यात वाचले बचावकर्ते (Watch Video)
बचाव पथक नदीत बुडालेल्या एका तरुणाचा शोध घेत होते. नदीच्या तीव्र प्रवाहात बोटीचा तोल गेला आणि ती उलटली, ज्यामुळे सर्व कर्मचारी पाण्यात पडले.
Boat Capsizes In Savitri River: रायगड जिल्ह्यातील पोलादपूरजवळील सावित्री नदीत सुरू असलेले बचाव कार्यदरम्यान मोठी दुर्घटना घडली. बचाव पथकाची बोट जोरदारार प्रवाहात उलटली (Boat Capsizes). हा नाट्यमय क्षण कॅमेऱ्यात कैद झाला, ज्यामध्ये बोट उलटल्यानंतर बचावकर्ते स्वतःला वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारताना दिसले. बचाव पथक नदीत बुडालेल्या एका तरुणाचा शोध घेत होते. नदीच्या तीव्र प्रवाहात बोटीचा तोल गेला आणि ती उलटली, ज्यामुळे सर्व कर्मचारी पाण्यात पडले. सुदैवाने, बचाव पथकातील सर्व सदस्य पोहून सुरक्षित ठिकाणी पोहोचले. तथापी, बचाव कर्मचाऱ्यांना कोणतीही दुखापत झाली नाही.
सावित्री नदीत बोट उलटली, पहा व्हिडिओ -
Maharashtra: A rescue team in Poladpur, Raigad, had a narrow escape yesterday when their boat overturned in the strong currents of the Savitri River while searching for a youth who had drowned. Fortunately, all team members survived by jumping into the water. The incident was… pic.twitter.com/D5fiFnMKNI
— IANS (@ians_india) June 24, 2025
मासेमारी करताना नदीत बुडून 2 भावांचा मृत्यू -
दरम्यान, दुसऱ्या एका घटनेत, 15 तासांच्या शोध मोहिमेनंतर मासेमारी करताना बुडालेल्या दोन भावांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. सागर धुमाळ (वय, 35) आणि अक्षय धुमाळ (वय,30) अशी मृतांची नावे आहेत. हे दोघेही गोरसाई गावातील रहिवासी होते. ते बृहन्मुंबई महानगरपालिकेचे (बीएमसी) कर्मचारी होते. ही दुःखद घटना 20 जून, शुक्रवारी संध्याकाळी घडली. हे दोघे भाऊ कामवारी नदीला जोडलेल्या धरणावर मासेमारीसाठी गेले होते. (हेही वाचा - Junnar Shocker: जुन्नरमधील 1200 फूट दरीच्या पायथ्याशी आढळला 40 वर्षीय पुरूष आणि महाविद्यालयीन मुलीचा मृतदेह, पोलिसांकडून शोध सुरू)
प्राप्त माहितीनुसार, अक्षय चुकून घसरून पाण्यात पडला. त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात सागरने पाण्यात उडी मारली, परंतु दोघेही प्रवाहात बुडाले. तथापी, स्थानिक रहिवाशांनी याबाबत माहिती दिल्यानंतर भिवंडी अग्निशमन दलाने 20 जून रोजी संध्याकाळी 5:10 वाजता शोध मोहीम सुरू केली. त्यानंतर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) बचाव कार्यात सहभागी झाले.
(The above story first appeared on LatestLY on Jun 24, 2025 02:52 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

