IPL Auction 2025 Live

Pune News : पुण्यात आता स्वस्त भाड्याच्या घरांची चिंता मिटली; पंतप्रधान आवास योजना आणि एसआरए उपक्रमांअंतर्गत काम सुरू

मात्र, विविध कारणांसाठी त्यांना भाड्याने राहण्यासाठी घर नाकारली जातात. आता तरूणांची ही समस्या लवकरच सुटणार आहे.

Photo Credit-Pixabay

Pune News : एखाद्या मोठ्या शहरात शिक्षणासाठी जाणे, नोकरी करणे आणि तेथेच स्थायिक होणे सर्वांचे स्वप्न असेत. पण, तिथं स्वत:चं घर नसेल तर भाड्यानं घर (rental house)मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. भाड्यानं घर शोधणं म्हणजे एक मोठा संघर्षच असतो. जर तूम्ही फॅमिलीसोबत असाल तर काहीवेळा लक बाय चान्स घर मिळेल. पण, एकट्या व्यक्तीला घर हवं असेल तर, शंभर वेळा नाक मुरडली जाणारी माणसं, पश्नांची मोठी लिस्ट अशा परिक्षांना सामोर जावं लागतं. बरं, मुलंमुलं (bachelor) राहताय तर घर नाही मिळणार आणि मुलींना भाड्याच्या घरात कसं ठेवायचं? तुम्हाला कुटुंब नाही का? अमुक वेळेत घरी यायचं, तमूक व्यक्तींना घरी नाही आणायचा या आणि अशा अनेक अटी पुढे करत भाड्याची घरं नाकारली जातात. म्हणूनच आता तरूणाईचा हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न आता प्रशासनाकडून सुरू आहे. (हेही वाचा: Pune Koyta Gang: भररस्त्यात टोळक्यांचा तिघांवर जीवघेणा हल्ला, पुण्यातील कोयत्या गॅंगचा धुमाकुळ (Watch Video))

पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी आता या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी आणि शहरात येणाऱ्या बाहेरील नागरिकांना सहजपणे भाड्यानं घर उपलब्ध व्हावं यासाठी एक नव्या योजनेचा प्रस्ताव मांडला आहे. पुणे महानगरपालिकेच्या 2024 - 25 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प मांडला जात असताना त्यांनी या योजनेसंदर्भातील सादरीकरण केलं. (हेही वाचा:Pune Airport Terminal : पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलच्या उद्घाटनाचा मुहूर्त ठरला; 'या' तारखेला पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार ऑनलाईन उद्घाटन)

पुण्यामध्ये नोकरी, शिक्षणासाठी येणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे. या शहरात वास्तव्यासाठीचं ठिकाण शोधताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. आता मात्र या समस्येवर तोडगा काढण्यात आला असून, सध्या पुणे महानरपालिकेकडून प्रायोगिक तत्त्वावर फ्लॅट भाडेतत्त्वावर मिळण्यासाठी पुण्याच्या बाणेर भागामध्ये काही घरं उपलब्ध करून दिली जाणार असल्याचं म्हटलं आहे. याबाबतच वृत्त पुणे मिररनं प्रसिद्ध केलं आहे.

दरम्यान, या योजनेसंदर्भातील सविस्तर माहिती अद्याप प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. मात्र, येत्या काळात या योजनेविषयीचे नियम, अटी, अशा सर्व माहिती जारी करण्यात येणार आहे. पुणे पालिकेकडून सुरुवातीपासूनच नागरिकांच्या वास्तव्याच्या दृष्टीनं गृहप्रकल्प योजना राबवण्यात आल्या होत्या. या अंतर्गत सध्या पंतप्रधान आवास योजना आणि एसआरए उपक्रमांअंतर्गत पालिकेकडून अनेक गृहयोजनांवर कामं सुरु आहेत. ही योजना सुरु करण्याआधी पालिकेकडून सविस्तर माहिती देण्यात येईल.