Ajit Pawar: मला विरोधी पक्षनेतेपदावरून मुक्त करा; अजित पवारांची पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याकडे विनंती

मी एवढ्या वर्षांपासून या संघटनेत सगळीकडे काम करत आहे. मला मंचावरील मान्यवरांना सांगायच आहे की, मला विरोधी पक्षनेतेपदात फार काही रस नव्हता. पण, आमदारांनी आग्रह केला. त्यांच्या आग्रहामुळे मी विरोधी पक्ष नेते पद स्वीकारल.

Ajit Pawar | (Photo Credit - ANI)

Ajit Pawar: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी बुधवारी महाराष्ट्र विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदापासून मुक्त होण्यासाठी पक्षाच्या नेतृत्वाकडे विनवणी केली आहे. मला विरोधी पक्षनेतेपदावरून (Leader of Opposition) मुक्त करा, त्याऐवजी मला पक्ष संघटनेत हवी ती जबाबदारी द्या असं अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात म्हटलं आहे.

अजित पवार पुढे बोलताना म्हणाले की, मला प्रथम स्थान मिळविण्यात कधीही रस नव्हता. मी एवढ्या वर्षांपासून या संघटनेत सगळीकडे काम करत आहे. मला मंचावरील मान्यवरांना सांगायच आहे की, मला विरोधी पक्षनेतेपदात फार काही रस नव्हता. पण, आमदारांनी आग्रह केला. त्यांच्या आग्रहामुळे मी विरोधी पक्ष नेते पद स्वीकारल. (हेही वाचा -Ajit Pawar On Eknath Shinde: तुम्ही काम करत नाही केवळ दाडी कुरवाळत बसतात, काम करा मी कौतुक करेल; अजित पवारांचा एकनाथ शिंदेना टोला)

गेल्या एक वर्षापासून मी विरोधी पक्षनेते पद सांभाळत आहे. ते सांभाळत असताना अनेकांना वाटतं की, मी कडक वागत नाही. कडक वागायचं म्हणजे नेमकी काय करायचं? समोरच्याची कॉलर पकडायची की काय? असा प्रश्न करत अजित पवार यांनी पक्षातील नेत्यांना घरचा आहेर दिला.

आता हे सगळं पुरे झालं. आता मला विरोधी पक्षनेते पदावरून मुक्त करा आणि संघटनेची एखादी जबाबदारी द्या. त्यानंतर पक्षाचं काम कशा पद्धतीने चालवतो ते पहा, असं आवाहनही यावेळी अजित पवार यांनी पक्षाध्यक्षांना दिलं. यावेळी अजित पवार यांनी भाजप-शिवसेना युती सरकारवर निशाणा साधला.