Konkan Railway Recruitment 2024 : कोकण रेल्वेत नोकरीची संधी! असिस्टंट लोको पायलटसह विविध पदांवर 190 जागांसाठी भरती
त्यानुसार, वरिष्ठ विभाग अभियंता, स्टेशन मास्टर, कमर्शियल पर्यवेक्षक पदासह इतर पदांच्या 190 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
Konkan Railway Recruitment 2024: रेल्वेत नोकरीची संधी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे, कारण भारतीय रेल्वेने कोकण रेल्वे विभागात अनेक रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. त्यानुसार, वरिष्ठ विभाग अभियंता, स्टेशन मास्टर, कमर्शियल पर्यवेक्षक पदासह इतर पदांच्या 190 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी पदभरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, वयोमर्यादा, मिळणारी वेतनश्रेणी इत्यादी माहिती वेबसाईटवरुन जाणून घ्यावी.
रिक्त पदे – 190
पदाचे नाव आणि तपशील:
कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत होणाऱ्या या भरती प्रक्रियेअंतर्गत सिनियर सेक्शन इंजिनिअर पदासाठी 5 जागा, स्टेशन मास्टर पदासाठी 10 जागा, कमर्शियल सुपरवाइजर 5 जागा, गुड्स ट्रेन मॅनेजर 5 जागा,टेक्निशियन III (Mechanical) 20 जागा, टेक्निशियन III (Electrical) 15 जागा,ESTM-III (S&T) पदासाठी 15 जागा, असिस्टंट लोको पायलट पदासाठी 15 जागा, पॉइंट्स मन पदासाठी 60 जागा आणि ट्रॅक मेंटेनर-Iपदासाठी 35 जागा, अशा मिळून एकूण 190 जागांववर भरती केली जाणार आहे.
शैक्षणिक पात्रता:
या भरती प्रक्रियेती रिक्त पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे. इयत्ता 10 वी, 12 वीसह कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार या भरतीमध्ये अर्ज करु शकता. पण यासह काही पदांसाठी 12 वीत Physics & Maths विषयात उत्तीर्ण असण्यासह इंजिनिअरिंगमधील विविध विषयांमधील पदवी आवश्यक आहे. या पदवी विषयांमध्ये(Civil, Mechanical/ Electrical / Electronics, Automobile) ITI (Electrician / Electronics Mechanic / Wireman/ Armature and Coil Winder, / Fitter /Heat Engine / Instrument Mechanic / Machinist / Mechanic Diesel / Mechanic (Motor Vehicle) / Millwright Maintenance Mechanic / Mechanic Radio & TV / Refrigeration and Air-conditioning Mechanic / Tractor Mechanic / Turner / Wireman) समावेश आहे. किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical / Electrical / Electronics / Automobile) आवश्यक आहे.
वयाची अट:
उमेदवाराचे वय किमान 18 ते 39 असणे आवश्यक आहे. एससी आणि एसटी उमेदवारांना वयात 5 वर्षे तर ओबीसी उमेदवारांना 3 वर्षे सूट देण्यात आली आहे.
अर्जाची प्रक्रिया:
या नोकरीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार हे 6 ऑक्टोबर 2024 पर्यंत अर्ज करू शकतात. ही अर्जाची प्रक्रिया 16 सप्टेंबर 2024 पासून सुरु होईल.
अर्ज शुल्क: 59
नोकरीचे ठिकाण :
कोकण रेल्वे
पगार:
भरती प्रक्रियेत अंतिम निवड झालेल्या उमेदवारांना विविध पदांनुसार दरमहा 44,900 हजार ते 18,000 दरम्यान पगार दिला जाणार आहे.अधिकृत जाहिरात आणि पाहण्यासाठी खालील लिंक क्लिक करा.