Mumbai Marathon 2024: मुंबई मॅरेथॉनचा निधी उभारणीचा विक्रम, 267 स्वयंसेवी संस्थांनी जमवले 58 कोटी रुपये
पाठमागील अनेक वर्षांमध्ये या मॅरेथॉनने अनेक विक्रम केले. मात्र, निधी उभारणीच्या बाबतीत यावर्षी प्रथमच मोठा विक्रम झाला आहे. स्वयंसेवी संस्थांच्या मदताने या मॅरेथॉनसाठी तब्बल 58 कोटी रुपयांचा निधी जमा झाला आहे.
टाटा मुंबई मॅरेथॉन ( Tata Mumbai Marathon) यंदा 19 व्या वर्षात पदार्पण करत आहे. पाठमागील अनेक वर्षांमध्ये या मॅरेथॉनने अनेक विक्रम केले. मात्र, निधी उभारणीच्या बाबतीत यावर्षी प्रथमच मोठा विक्रम झाला आहे. स्वयंसेवी संस्थांच्या मदताने या मॅरेथॉनसाठी तब्बल 58 कोटी रुपयांचा निधी जमा झाला आहे. ही मॅरेथॉन (TMM) येत्या 21 जानेवारी रोजी पार पडत आहे. त्यासाठी 267 एनजीओज वेगवेगळ्या कारणासाठी फंड जमा करत आहेत. दक्षिण मुंबईतील मॅरेथॉनच्या पत्रकार केंद्रात (सोबो) पत्रकार परिषदेत ही घोषणा मंगळवारी दुपारी करण्यात आली. युनायटेड वे मुंबई (UWM) या कार्यक्रमासाठी परोपकारी भागीदार म्हणून उभे आहे.
मॅरेथॉनचा 750 हून अधिक NGO ला फायदा
मुंबई मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजक आणि प्रोकमचे प्रवक्ते म्हणाले, TMM शी संबंधित धर्मादाय संस्थाचा असलेला पाठिंबा फार जुना आणि मोठा आहे. मॅरेथॉनच्या सुरुवातीच्याच काही काळात 12 NGOs द्वारे एकत्रित एकूण 43 लाख रुपये उभारले गेले आणि त्या पुढील काळात हाच निधी एकूण 400 कोटी रुपयांपेक्षाही अधिक वाढत गेला. ज्याचा 750 हून अधिक NGO ला फायदा झाला, इव्हेंट आयोजकांच्या मते प्रोकमचे प्रवक्ते. (हेही वाचा, Mumbai Police: कर्तव्यावर असताना पोलिस हवालदार कांचन प्रमोद भिसे यांचा मृत्यू)
मनीषा खेमलानी सर्वाधिक निधी जमवणाऱ्या व्यक्ती
UWM चे CEO जॉर्ज आयकारा यांनी 2009 पासून त्यांचा मॅरेथॉनमधील सहभागाविषयी असलेल्या सातत्याबाबत सांगितले की, मॅरेथॉन सामाजिक प्रभावासाठी एक शक्तिशाली प्रेरणादायी उपक्रम आहे. उल्लेखनीय म्हणजे, सेंट्रल चिन्मय मिशन ट्रस्टच्या सीईओ मनीषा खेमलानी या शर्यतीच्या इतिहासातील सर्वाधिक वैयक्तिक निधी उभारणाऱ्या म्हणून व्यक्ती ठरल्या आहेत. ज्यांनी गेल्या काही वर्षांत 7.6 कोटी रुपये मिळवले. खेमलानी यांनी त्यांच्या सहभागातून फिटनेस आणि महिला सक्षमीकरणाप्रती तिची बांधिलकी अधोरेखित केली. (हेही वाचा, मुंबई मॅरेथॉनला गालबोट! 64 वर्षीय वृद्ध गजानन माळजलकर यांचा कार्डियाक अरेस्ट मुळे मृत्यू)
सामजातील सकारात्मक प्रभाव अधोरेखीत
प्रोकॅम इंटरनॅशनलचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक विवेक सिंग यांनी, महिला सशक्तीकरणावर टीएमएमच्या परिवर्तनात्मक प्रभावावर जोर देत, शर्यतीच्या दिवसापूर्वीच धावपटूंनी 58 कोटी रुपयांहून अधिक गोळा केलेली महत्त्वपूर्ण कामगिरी सांगितली. सिंग यांनी मॅरेथॉनने प्रेरित होऊन, सशक्तीकरणाचे साधन म्हणून धावणे, अडथळे पार करणे आणि सामर्थ्याची भावना वाढविणाऱ्या महिलांच्या समूहात वाढ झाल्याचे म्हटले.
ग्रीन बिब उपक्रमाचा एक भाग म्हणून, TMM आणि UWM ने 4,371 झाडे लावण्यासाठी 27 लाखांपेक्षा जास्त रक्कम जमा केली. ग्रीन बिब धावपटूंना 2,500 हून अधिक धावपटूंकडून देणग्या देऊन वृक्षारोपण आणि देखभाल करण्यास मदत करते. सोलापूर जिल्ह्य़ात ही झाडे लावण्यात येणार असून, मॅरेथॉनचा समाजावर होणारा परिणाम याला पर्यावरणपूरक परिमाण जोडणार आहे.