Shocking: उदयनराजे भोसले आहेत अब्जाधीश तर त्यांच्या नावे असलेली एकूण जमीन ही काही देशांच्या क्षेत्रफळापेक्षाही जास्त
त्यांच्या नावावर एकूण ४३४.३५ एकर जमीन आहे. तुम्ही हे जाणून थक्क व्हाल की उदयनराजेंकडे असलेली एकूण जमीन ही काही देशांच्या क्षेत्रफळापेक्षाही जास्त आहे.
सातारा मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीत हॅट्रिक मारत वीज मिळवणारे उदयनराजे भोसले हे पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिट्ठी देत भाजपात प्रवेश केला आणि त्याचसोबत त्यांना त्यांच्या खासदारकीचाही राजीनामा द्यावा लागला होता.
आता साताऱ्यामध्ये पोट निवडणूक होणार आहे आणि त्यात उदयनराजे यांची लढत माजी राज्यपाल राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांच्याशी होणार आहे.
उदयनराजे यांनी गेल्या निवडणुकीत भरलेल्या अर्जासोबत प्रतिज्ञापत्रात त्यांच्या मालकीची एकूण संपत्ती नमूद केली होती. त्यानुसार ते कोट्याधीश नसून अब्जाधीश आहेत हे सिद्ध झालं होतं. त्यांनी जाहीर केलेल्या संपत्ती नुसार त्यांच्याकडे १२ कोटी ३१ लाख ८४ हजारांची जंगम, तर एक कोटी १३ लाख नऊ हजार रुपयांची स्थावर मालमत्ता होती. इतकेच नव्हे तर एक अब्ज १६ कोटी ३५ लाखांची शेतजमीन होती. त्याचसोबत ३७ किलो सोने ज्याची किंमत एक कोटी ३३ लाख ७५ हजार रुपये होती. उदयनराजेंकडे ९१ लाख ७० हजारांच्या चार अलिशान गाड्या असून त्यात ऑडी, मर्सिडिज बेन्ज, इन्डिवर, मारुती जिप्सी या गाड्यांचा समावेश आहे.
आश्चर्याची बाब म्हणजे आता त्यांच्या संपत्तीत अजून वाढ झालेली दिसून येते. त्यांनी पोट निवडणुकीच्या अर्जासोबत लिहिलेल्या मालमत्तेत १४ कोटी ४४ लाखांपेक्षाही अधिक वाढ दिसून आली आहे.
गडकिल्ले भाड्याने देण्यात काहीच गैर नाही; त्याने नक्कीच अर्थव्यवस्था सुधारेल: उदयनराजे भोसले
उदयनराजेंकडे आता असलेल्या स्थावर मालमत्ता १ अब्ज ८५ कोटींच्या घरात आहे. त्यांच्या नावावर एकूण ४३४.३५ एकर जमीन आहे. तुम्ही हे जाणून थक्क व्हाल की उदयनराजेंकडे असलेली एकूण जमीन ही काही देशांच्या क्षेत्रफळापेक्षाही जास्त आहे.