रेव्ह पार्टीवर छापा, तरुण-तरुणींना अटक

पोलिसांनी शनिवारी रात्री उशिरा या रेव्ह पार्टीवर छापा टाकत 62 जणांना अटक केली आहे.

रेव्ह पार्टी (फोटो सौजन्य- फेसबुक)
ऐरोली येथे सेक्टर-9 येथील चायना गार्डनजवळ रेव्ह पार्टी चालू होती. पोलिसांनी शनिवारी रात्री उशिरा या रेव्ह पार्टीवर छापा टाकत 62 जणांना अटक केली आहे.
ऐरोली सेक्टर 9 मध्ये बेकायदेशीरपणे सुरू असणाऱ्या चायना गार्डन येथे चायनीज कॉर्नरच्या मागील बाजूस  दोन आठवड्यांआधी  भाजप राजकीय नेत्याचा वाढदिवस मोठय़ा थाटात साजरा करण्यात आला होता. त्यांनतर याच ठिकाणी करण पाटील व मयूर मढवी यांनी रेव्ह पार्टी ठेवली होती. शनिवारी रात्री या ठिकाणी डिजेसह जोरात पार्टी सुरू होती. पोलिसांना या रेव्ह पार्टीची महिती मिळताच या पर्टीवर छापा टाकून तरुण तरुणींना अटक केली आहे.
 पोलिसांनी या पार्टीच्या चौकशीदरम्यान ड्रग्ज आढळले नसून विदेशी दारु आणि हुक्का सापडला असल्याचे सांगितले आहे. तसेच या सर्व तरुणांना 7 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे.


संबंधित बातम्या