Ratnagiri Fire: रत्नागिरीत पहाटे सिलेंडरचा स्फोटात घराला लागली भीषण आग; दोन महिलांचा मृत्यू

रत्नागिरी (Ratnagiri) शहरानजिक असलेल्या शिरगाव ग्रामपंचायतीच्या (Shirgaon Grampanchayat) हद्दीमध्ये असलेल्या शेट्ये नगर (Shetyenagar) येथील दुमजली एका घराला आज पहाटे 5 च्या सुमारास आग लागल्याचं वृत्त समोर आलं आहे.

Fire | Pixabay.com

रत्नागिरी (Ratnagiri) शहरानजिक असलेल्या शिरगाव ग्रामपंचायतीच्या (Shirgaon Grampanchayat) हद्दीमध्ये असलेल्या शेट्ये नगर (Shetyenagar) येथील दुमजली एका घराला आज पहाटे 5 च्या सुमारास आग लागल्याचं वृत्त समोर आलं आहे. घरात सिलेंडरचा स्फोट झाल्याने ही आग लागल्याचं सांगितलं जात आहे. आगीचा भडका इतका भयंकर होता की घरातील 4 पैकी दोनच व्यक्ती बाहेर पडू शकल्या. दोन महिला घरात अडकल्या होत्या. या घटनेमध्ये दोघींचा मृत्यू झाला आहे. स्फोटानंतर या महिला काही तास स्लॅब खाली दबल्या गेल्याने त्यांचा मृत्यू झाला.

अश्फाफ काझी या रिक्षा चालकाच्या घराला ही आग लागली. पहाटे 5 च्या सुमारास त्यांनी घरात लाईटचं बटण ऑन केले आणि क्षणात भडका उडाला. बघता बघता आग पसरली. सिलेंडरच्या स्फोटाची तीव्रता इतकी होती की सुमारे 2 किलोमीटरच्या आवरात त्याचा आवाज ऐकू आला होता. घटनेची माहिती मिळताच तातडीने पोलिस, रूग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. आगीत अडकलेल्यांसाठी शर्थीचे प्रयत्न सुरू झाले.

प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, स्फोटाची भीषणता इतकी होती की त्यांना आजूबाजुच्या घरालाही त्याचा फटका बसला. आजुबाजूच्या घरातीलही काचा फूटल्याचं पहायला मिळालं आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif