Rashmi Shukla New DGP of Maharashtra: रश्मी शुक्ला यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती
त्यांनी पुण्याचे पोलीस आयुक्त आणि राज्य गुप्तचर विभागाचे संचालक म्हणून पदभार सांभाळला आहे.
Rashmi Shukla New DGP of Maharashtra: वरिष्ठ भारतीय पोलीस सेवा (IPS) अधिकारी रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांची महाराष्ट्राचे नवे पोलीस महासंचालक (New DGP of Maharashtra) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी शुक्ला यांनी महाराष्ट्रातील अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. त्यांनी पुण्याचे पोलीस आयुक्त आणि राज्य गुप्तचर विभागाचे संचालक म्हणून पदभार सांभाळला आहे. याशिवाय रश्मी शुक्ला यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (CRPF) अतिरिक्त महासंचालक म्हणूनही काम केले आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने रश्मी शुक्ला यांच्याविरुद्ध नोंदवलेले फोन टॅपिंगचे दोन खटले रद्द केल्यानंतर तीन महिन्यांहून अधिक कालावधीनंतर त्यांची पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला. रश्मी शुक्ला यांच्यावर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचे फोन टॅप केल्याचा आरोप करण्यात आला होता. (हेही वाचा -Phone Tapping Case: फोन टॅपिंग प्रकरणी IPS Officer Rashmi Shukla यांना मोठा दिलासा; बॉम्बे हायकोर्टाने रद्द केला त्यांच्या विरोधातील FIR)
तथापी, काही पोलिस अधिकारी आणि पैशासाठी बदल्या आणि पोस्टिंग ऑफर करणारे मध्यस्थ यांच्यातील संबंध उघड करणारा एक वर्गीकृत अहवाल लीक केल्याचाही शुक्ला यांच्यावर आरोप आहे. त्यांनी 2020 मध्ये राज्य गुप्तचर विभागाच्या (SID) आयुक्त असताना तयार केलेला गोपनीय अहवाल लीक केला होता. (हेही वाचा - Rashmi Shukla: ड्रग्जच्या नावाखाली नाना पटोले, बच्चू कडू यांच्यासह अनेकांचे फोन टॅप; गृहमंत्री वळसे पाटील यांची माहिती)
मात्र, शुक्ला यांनी कोणतेही गैरकृत्य केल्याचा आरोप नाकारला आहे. रश्मी शुक्ला यांनी दावा केला आहे की, त्यांनी राष्ट्रीय सुरक्षा आणि सार्वजनिक सेवेच्या हितासाठी काम केले आहे.