Loksabha Election 2024: रामटेक लोकसभा मतदारसंघातून रश्मी बर्वे यांची उमेदवारी रद्द, निवडणूक आयोगाचा निर्णय
नागपूर येथीस रामटेक लोकसभा मतदारसंघातील कॉंग्रेस उमेदवार रश्मी एस बर्वे यांचे जात प्रमाणपत्र नाकारले आहे.
Loksabha Election 2024: महाराष्ट्र निवडणूक आयोगाकडून कॉंग्रेलसला मोठा धक्का बसला आहे. नागपूर येथीस रामटेक लोकसभा मतदारसंघातील कॉंग्रेस उमेदवार रश्मी एस बर्वे यांचे जात प्रमाणपत्र नाकारले आहे. जात प्रमाणपत्राची वैधता या आठवड्याच्या सुरुवातीला रश्मी एस. गुरुवारी निवडणूक अधिकाऱ्यांनी बर्वे यांच्या उमेदवारी अर्जाच्या छाननीदरम्यान हा खुलासा केला आहे. उमेदवारी रद्द केल्याने महाविकास आघाडी रद्द करण्यात आली आहे. कॉंग्रेसने जाहिर केलेल्या नावापैकी रश्मी हे नाव एक आहे. (हेही वाचा- तब्बल 238 वेळा हरूनही मानली नाही हार;)
प्रमाणपत्र रद्द झाल्याने नामाकंन अर्जाची छाननीत जात वैधता प्रमाणपत्र रद्द झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सुनावणी घेतली. याचिकाकर्तते सुनील साळवे आणि रश्मी बर्वे यांच्या बाजू ऐकून घेतली. त्यानंतर जात वैधता समितीच्या जात वैधता प्रमाणपत्र रद्द केल्याने उमेदवारी भरण्यास अपात्र ठरवत उमेदवारी रद्द करण्यात आली.
उमेदवारी रद्द केल्याने रामटेक लोकसभा मतदारसंघातील त्यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले. मुंबई आणि नागपूरातील कॉंग्रेस नेत्यांनी या प्रकरणावर भाष्य करण्यास नकार दिला. जात प्रमाणपत्र अवैद्य ठरल्याने रामटेक येथे एकच खळबळ उडाली आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयानंतर त्यांनी कायदेशीर लढाई लढण्याचे तयारी केली आहे. अनेकांनी रश्मी बर्वे यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे.