मुंबईतील ससून बंदराजवळ सापडला एका दुर्मिळ मासा; वस्तुसंग्रहालयात करण्यात येणार जतन

एप्रिल 2017 मध्ये या माशाची ‘स्लेन्डर सनफिश’ ही प्रजाती क्रॉफर्ड मार्केट येथील मासळी बाजारात दिसण्यात आली होती.

Ocean Sunfish (Photo Credits: commons.wikimedia )

समुद्राच्या खोलवर राहणारा एका दुर्मिळ मासा म्हणजे 'सनफिश' हा नुकताच मुंबईतील ससून बंदराजवळ आढळून आला. या माशाला तशी बाजारात काहीच किंमत मिळत नसल्याने त्याला बंदराजवळ टाकून देण्यात आले होते. मात्र, काही मच्छीमारांना या मत्स्यप्रजातीची दुर्मीळते विषयी माहित होते म्हणूनच त्यांनी फोर्ट येथील 'छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालया'शी संपर्क साधला व या माशाला तिथे नेण्यात आले.

आता वस्तुसंग्रहालयाकडून या माशाच्या नमुन्याचे जतन करण्यात येणार आहेत.

उत्तर प्रदेश: माशाच्या शरीरावर 'अल्लाह' लिहिल्याचे दिसल्याने 5 लाखांची बोली

मुंबईमध्ये 'सनफिश'च्या दर्शनाची ही तिसरी वेळ आहे. एप्रिल 2017 मध्ये या माशाची ‘स्लेन्डर सनफिश’ ही प्रजाती क्रॉफर्ड मार्केट येथील मासळी बाजारात दिसण्यात आली होती. त्या माशाचे वजन अंदाजे तीन किलो आणि लांबी दोन फूट एवढी होती. तसेच जवळपास वर्षभरापूर्वी ससून बंदरात चाळीस किलो वजनी आणि तीन फूट लांब 'ओशन सनफिश' ही प्रजाती आढळली होती.

आज ससून बंदराजवळच याच प्रजातीचा अंदाजे तीन फूट लांबीचा आणि तीस किलो वजनाचा 'सनफिश' आढळला.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif