The Legend of Maula Jatt: 'मल्टीप्लेक्सच्या काचा महाग असतात', अमेय खोपकर यांचा इशारा; 'द लेजेंड ऑफ मौला जट्ट' चित्रपटास मनसेचा विरोध

'द लेजेंड ऑफ मौला जट्ट' (The Legend of Maula Jatt) हा पाकिस्तानी चित्रपट (Pakistani Movies) जगभरात चर्चेत आहे. बॉक्स ऑफीसवरही या चित्रपटाची चांगलीच चलती आहे. जगभरातील विविध देशांमध्ये प्रदर्शित झाल्यावर हा चित्रपट आता भारतातही प्रदर्शित होऊ घातला आहे. दरम्यान, या चित्रपटाच्या प्रदर्शनास राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) पक्षाचा विरोध आहे.

Amey Khopkar And The Legend of Maula Jatt | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

'द लेजेंड ऑफ मौला जट्ट' (The Legend of Maula Jatt) हा पाकिस्तानी चित्रपट (Pakistani Movies) जगभरात चर्चेत आहे. बॉक्स ऑफीसवरही या चित्रपटाची चांगलीच चलती आहे. जगभरातील विविध देशांमध्ये प्रदर्शित झाल्यावर हा चित्रपट आता भारतातही प्रदर्शित होऊ घातला आहे. दरम्यान, या चित्रपटाच्या प्रदर्शनास राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) पक्षाचा विरोध आहे. मनसे चित्रपट सेना अध्यक्ष अमेय खोपकर (Ameya Khopkar) यांनी याबाबत मल्टीप्लेक्स थिएटर्स चालक, मालकांना इशारा दिला आहे. पाकिस्तानी कलाकार आणि कलाकृती असलेला कोणताच चित्रपट आम्ही महाराष्ट्रच नव्हे तर भारतात कुठेही प्रदर्शित होऊ देणार नाही, असे अमेय खोपकर यांनी म्हटले आहे. या संदर्भात एक व्हिडिओही खोपकर यांनी ट्विटरवर अपलोड केला आहे. या व्हिडिओत ते 'मल्टीप्लेक्सच्या काचा महाग असतात' असा इशाराही देताना ते दिसतात.

अमेय खोपकर यांनी ट्विटरच्यामाध्यमातून दिलेल्या इशाऱ्यात म्हटले आहे की, 'फवाद खानचा ‘द लीजंड ऑफ मौला जट्ट’ हा पाकिस्तानी चित्रपट भारतात प्रदर्शित करण्यासाठी हालचाली सुरु आहेत. चीड आणणारी गोष्ट म्हणजे भारतीय कंपनी चित्रपट प्रदर्शनासाठी पायघड्या घालतेय. राजसाहेबांनी दिलेल्या आदेशानुसार आम्ही हा चित्रपट राज्यासह देशभरात कुठेही प्रदर्शित होऊ देणार नाही.' पुढच्याच ट्विटमध्ये ते म्हणतात 'नाही म्हणजे नाहीच. फवाद खानचे जे कुणी देशद्रोही फॅन्स असतील त्यांनी खुशाल पाकिस्तानमध्ये जाऊन सिनेमा बघावा.'

अमेय खोपकर ट्विट

फवाद खान (Mahira Khan) आणि माहिरा खान (Mahira Khan) यांच्या मुख्य भूमिका असलेला चित्रपट 'The Legend of Maula Jatt' 13 ऑक्टोबर राजी जगभरात रीलिज करण्यात आला. विशेष म्हणजे जगभरात सर्वाधिक ओपनिंग मिळवणारा पाकिस्तानी चित्रपट म्हणून या चित्रपटाला यश मिळाले आहे. या चित्रपटात हमजा अली अब्बासी आणि हुमैमा मलिक यांच्या प्रमुख भुमिका आहेत. हा चित्रपट 1979 च्या मौला जट्ट चित्रपटाचा रिमेक आहे.

अमेय खोपकर व्हिडिओ

'The Legend of Maula Jatt' चित्रपटाने पाकिस्तानीच चित्रपटाचे आजवरचे सर्व विक्रम मोडले आहेत. बिलाल लाशरी यांचे दिग्दर्शन असलेल्या चित्रपटाच्या माध्यमातून प्रथमच एखादा पाकिस्तानी चित्रपट आंतरराष्ट्रीय पातळीवर चांगली कामगिरी करताना दिसतो आहे.दिग्दर्शक बिलाल लाशरी यांनी ट्विटर शेअर केल्याल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, चित्रपटाने जगभरातून 50 हजार कोटी पाकिस्तानी रुपये गल्ला केला आहे.

ट्विट

दरम्यान, पाकिस्तानी कलाकारांना मनसेने यापूर्वीही अनेकदा विरोध केला आहे. मनसे आणि इतर काही संघटनांनी केलेल्या विरोधामुळे भारतीय चित्रपटांमध्ये पाकिस्तानी कलाकारांना 'नो एण्ट्री' आहे. त्यामुळे 'The Legend of Maula Jatt' हा चित्रपट भारता प्रदर्शित होण्याच्या वाटेवर असताना मनसे काय भूमिका घेते याबाबत सर्वांना उत्सुकता होती. अखेर मनसेने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आता राज्य सरकार आणि केंद्र सरकार काय भूमिका घेते याबाबत उत्सुकता आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement