राज ठाकरेंनी दिल्या डॉ. मनमोहन सिंहांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
मनमोहन सिंहाबाबतच्या या भावना
भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचा आज वाढदिवस आहे. अत्यंत मितभाषी पण उत्तम अर्थशास्त्रज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर पंतप्रधान असताना त्यांच्या अबोल स्वभावामुळे खूप टीका झाली होती. त्यापैकी एक नाव महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरेदेखील होते. आज डॉ. मनमोहन सिंहाच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राज ठाकरेंनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना त्यांच्या ज्ञानाचं आणि भारतीय अर्थव्यवस्थेतेला स्थिर ठेवण्यासाठी केलेल्या भरीव कामगिरीचं कौतुकंही केलं आहे.
राज ठाकरेंच्या शुभेच्छा
राजकीय नेता राज ठाकरेच्या व्यक्तिमत्त्वाची दुसरी दमदार बाजू म्हणजे व्यंगचित्रकार. ऐरवी अनेक लहान मोठ्या गोष्टींवर आपलं मत व्यक्त करताना राज ठाकरे 'व्यंगचित्रा'च्या माध्यमातून फटकारे ओढतात. मात्र डॉ. मनमोहन सिंहांना यंदा शुभेच्छा देताना त्यांनी व्यंगचित्राऐवजी खास संदेश शेअर केला आहे.
मनमोहन सिंगांचं कौतुक
देशाची अर्थव्यवस्था आर्थिक निरक्षरांनी गर्तेत ढकलली असताना माझ्यासह तमाम भारतीयांना मनमोहन सिंग यांच्या ज्ञानाची उणीव नक्कीच भासत आहे, असे राज ठाकरेंनी शेअर केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
देशापरदेशातून आज डॉ. मनमोहन सिंगावर वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही ट्विटरच्या माध्यमातून मनमोहन सिंह यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.