Raj Thackeray: आज मुंबईत ‘राज’गर्जना, नेस्को ग्राउंडवर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची सभा

दरम्यान राज ठाकरे आज मनसैनिकांना संबोधित करणार आहे. या सभेत राज ठाकरे नक्कीच सध्याच्या राजकीय परिस्थितीवर बोलतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

MNS Leader Raj Thackeray (Photo Credits-Twitter)

आज मुंबईतील (Mumbai) नेस्को ग्राउंडवर (Nesco Ground) मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची तोफ पुन्हा धडाडणार आहे. राज ठाकरेंच्या निशाण्यावर यावेळी कोण असेल यावर राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. गेले का काही दिवसात राज्याच्या राजकारणात (Maharashtra Politics) बऱ्याच घडामोडी घडल्यात पण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याबाबत शांतता ठेवतांना दिसले. कुठल्याही गोष्टीत त्यांनी आपली प्रतिक्रीया नोंदवली नाही. पण आज मनसे गटाध्यक्षांचा मेळावा होणार आहे. दरम्यान राज ठाकरे आज मनसैनिकांना संबोधित करणार आहे. या सभेत राज ठाकरे नक्कीच सध्याच्या राजकीय परिस्थितीवर बोलतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. यापूर्वी जार ठाकरेंनी औरंगाबादेत (Aurangabad) जाहीर सभा घेतली होती त्यात भोंग्याचा मुद्दा चांगलाचं गाजला होता पण आता राज्यातील राजकीय समीकरण बदलल्याचं चित्र आहे. म्हणून राज ठाकरेंच्या आजच्या सभेला विशेष महत्व आहे.

 

पुढील काही दिवसातचं मुंबई महापालिकेच्या निवडणुक (BMC Election) होणार असल्याची चर्चा आहे. तरी या निवडणुकीत राज ठाकरेंची (Raj Thackeray) काय भुमिका असणार याबाबतची उत्सुकता मनसैनिकांना लागली आहे.  गेले काही दिवसात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री राज ठाकरे (DCM Raj Thackeray) आणि मनसे अध्यक्ष एकाच फ्रेममध्ये दिसुन आले. तरी ही फ्रेम (Frame) म्हणजे महाराष्ट्रातील नव्या राजकीय (Maharashtra Politics) समीकरणाची नवी नांदी आहे का अशी चर्चा होत आहे. (हे ही वाचा:- Uddhav Thackeray Speech: उद्धव ठाकरेंचा शिंदे गटासह भाजपवर जोरदार हल्लाबोल, म्हणाले - हा पक्ष आहे की चोरांचा बाजार?)

 

गेले काही दिवसात कर्नाटक (Karnataka)-महाराष्ट्र (Maharashtra) सीमावाद, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांचं छत्रपती शिवाजी महाराजांबाबतचं (Chhatrapati Shivaji Maharaj) वक्तव्य, हर हर महादेव (Har Har Mahadev) सिनेमाचा वाद, राहुल गांधींचं (Rahul Gandhi) सावरकरांवरील वक्तव्य किंवा महाराष्ट्रातील भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) असे अनेक मुद्दे गाजत आहेत. या मुद्द्यांवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आपलं निर्भिड मत मांडतील का याबाबत सगळ्यांना उत्सुकता लागली आहे.