वरळी पोलीस वसाहतीच्या समस्या तत्काळ दूर करत आठ दिवसांच्या आत कार्यवाही करण्याच्या सूचना; राज ठाकरेंच्या भेटी नंतर मुख्यमंत्र्याचे निर्देश
हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावे, अशी मागणी राज ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
आज मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackrey) आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची महत्त्वाची बैठक पार पडली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackrey) यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची त्यांच्या वर्षा निवासस्थानी भेट घेण्यासाठी गेले होते. या महत्त्वाच्या बैठकीला मनसे नेते बाळा नांदगावकर, आमदार राजू पाटील, मनसेचे माजी आमदार नितीन सरदेसाई, प्रवक्ते संदीप देशपांडे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
पाहा पोस्ट -
या बैठकीनंतर मुंबईतल्या पोलिसांना राहण्यासाठी घरे नाहीत, आपल्याला पोलिसांसाठी लवचिक भूमिका ठेवावी लागेल, म्हाडा, सिडको, एमएमआरडीए, नगरविकास विभाग यांनी एकत्रितपणे आपल्याला कशा पद्धतीने मुंबई आणि परिसरात पोलिसांसाठी सेवा सदनिका उपलब्ध करून देता येतील ते प्राधान्याने आणि कालबद्ध पद्धतीने ठरवावे असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. वरळी येथील पोलीस वसाहतीच्या समस्याही तत्काळ दूर करण्यासाठी आठ दिवसांच्या आत कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
पाहा मनसेची पोस्ट -
उरण येथे यशश्री शिंदे या तरुणीची हत्या करण्यात आली आहे. हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावे, अशी मागणी राज ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. यासह राज्यभरातील महत्वाच्या घटकांर या दोन नेत्यांमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे.