Raj Thackeray Meets Kalpita Pimple: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतली सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांची ज्युपिटर हॉस्पिटल मध्ये भेट; दिला 'हा' शब्द!
जे काय घडलं त्याचं दु:ख आहे, पण या प्रकारात काळ सोकावतोय. हल्ला करण्याची हिम्मत ठेचणं आता गरजेचं आहे. असं म्हटलं आहे.
ठाण्यामध्ये अनधिकृत फेरीवाल्यांविरूद्ध कारवाईचा बडगा उचलणार्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर काही दिवसांपूर्वी एक जीवघेणा झाला. हाताची तीन बोटं छटली गेली. या घटनेचा सध्या सार्याच स्तरातून निषेध वर्तवण्यात येत आहे. आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वतः ठाण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटल मध्ये कल्पिता पिंपळे यांची भेट घेतली आहे. यावेळी त्यांनी 'तुम्ही लवकर बर्या व्हा बाकीच आम्ही बघतो' असा विश्वास देत कल्पिता यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यानंतर राज ठाकरेंनी हॉस्पिटलमध्येच पोलिसांची देखील भेट घेतली असून कारवाईचा आढावा घेतला आहे.
दरम्यान राज ठाकरे यांनी कल्पिता पिंपळेंची भेट घेतल्यानंतर मीडीयाशी बोलताना, 'सध्या केवळ प्रकृतीची चौकशी केली आहे. जे काय घडलं त्याचं दु:ख आहे, पण या प्रकारात काळ सोकावतोय. हल्ला करण्याची हिम्मत ठेचणं आता गरजेचं आहे. पोलीस, न्यायालय त्यांचं काम करत आहे. योग्य न्याय देईल अशी अपेक्षा आहे. पोलिसांनी त्यांची कारवाई केली, त्याला कठोर शिक्षा होईल असं वाटतंय, असं राज ठाकरे म्हणाले. तर काल राज ठाकरेंनी आरोपी पोलिसांच्या तावडीतून सुटल्यानंतर आमच्या हातात असेल असे म्हटलं आहे. (नक्की वाचा: Thane Municipal Corporation: ठाणे महापालिकेच्या सहायक आयुक्तावर हल्ला करणाऱ्या आरोपीला 4 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी).
राज ठाकरेंनी घेतली भेट
मनसे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी पक्षाकडून जो आदेश मिळेल त्याची पूर्ण पूर्तता होईल असे म्हटलं आहे. दरम्यान आज राज ठाकरे ज्युपिटर हॉस्पिटल मधून थेट मुंबईला रवाना झाले आहे. अद्याप याप्रकरणी पुढची वाटचाल मनसेकडून अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.
राज ठाकरेंसोबत ज्युपिटर हॉस्पिटल मध्ये अमित ठाकरे, बाळ नांदगावकर, अविनाश जाधव, नितीन सरदेसाई आदी नेते आणि मनसे कार्यकर्ते होते.