Hindi Mandate in Schools in Maharashtra: शाळांमध्ये हिंदी सक्ती विरोधात ठाकरे बंधू एकत्र दिसणार; संजय राऊत यांनी राज ठाकरे- उद्धव ठाकरे यांचा 'खास' फोटो पोस्ट करत दिली माहिती

ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्च्याची अद्याप तारीख जाहीर झालेली नाही पण कालच राज ठाकरेंनी 5 जुलैला सार्‍या मराठी बांधवांनी मराठीसाठी एकत्र येण्याचं आवाहन केले आहे.

Hindi Mandate in Schools in Maharashtra:  शाळांमध्ये हिंदी सक्ती विरोधात ठाकरे बंधू एकत्र दिसणार; संजय राऊत यांनी राज ठाकरे- उद्धव ठाकरे यांचा 'खास' फोटो पोस्ट करत दिली माहिती
Thackeray Brothers | X@SanjayRaut

राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)  एकत्र येणार यावर 'सकारात्मक' चर्चा सुरू असताना आता संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याकडून X वर पोस्ट करत  महाराष्ट्रात शाळांमध्ये हिंदी सक्ती विरोधात  'एकच आणि एकत्र मोर्चा निघेल!' अशी माहिती देण्यात आली आहे. यावेळी संजय राऊत यांनी ठाकरे बंधूंचा एक जुना एकत्र फोटो पोस्ट केला आहे. त्या फोटोत बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटो समोर ते दोघे उभे असल्याचं दिसत आहे.  त्यामुळे शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर काही निवडक प्रसंगी ते दोघे एकत्र आले होते पण या  हिंदी सक्ती विरोधासाठी पहिल्यांदाच  आंदोलनासाठी ठाकरे बंधू एकत्र येणार आहे.  (हेही वाचा, महाराष्ट्रात शालेय शिक्षणात तिसरी भाषा हिंदी अनिवार्य करण्यावरून मनसे आक्रमक; कार्यकर्त्यांचा दुकानदारांना पाठ्यपुस्तकं न विकण्याचा इशारा).

संजय राऊत पोस्ट

हिंदी विरोधी मोर्च्याची तारीख काय?

दरम्यान काल राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी हिंदी सक्ती विरूद्ध आवाज उठवण्यासाठी स्वतंत्र पत्रकार परिषदा घेतल्या होत्या. त्यामध्ये राज ठाकरेंनी आधी 6 जुलै आणि नंतर 5 जुलै अशी मोर्च्याची तारीख सांगितली होती. तर उद्धव ठाकरेंनी मराठी समन्वय समितीच्या  एल्गाराला पाठिंबा देत 7 जुलैला मोर्चा निघणार असं सांगितलं होतं पण आता ठाकरे बंधू एकत्र येऊन नेमका कधी मोर्चा काढणार ? याची स्पष्ट माहिती संजय राऊतांच्या पोस्ट मध्ये नाही पण 5 जुलैच्या मोर्च्यामध्येच सारे एकत्र दिसतील असा अंदाज आहे.

झेंडा नाही केवळ अजेंडा

राज ठाकरे यांनी काल मोर्च्याची घोषणा करताना यामध्ये सार्‍या मराठी बांधवांनी, कलाकारांनी एकत्र यावं असं आवाहन केले होते. यावेळी सार्‍या राजकीय पक्षांनांही  आपला 'झेंडा' बाजूला ठेवून केवळ मराठीच्या अजेंड्यासाठी एकत्र येण्याचं आवाहन केले होते. याचवेळी बोलताना राज ठाकरेंनी 'वाद बाजूला ठेवत मराठी आणि महाराष्ट्रासाठी एकत्र येणं म्हणजे काय या वक्तव्याचा मोर्चामध्ये प्रत्यय येईल असेही राज ठाकरे म्हणाले आहेत.

5 जुलैला गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान असा मराठी भाषेसाठीचा मोर्चा निघणार आहे. असे राज ठाकरे यांनी काल जाहीर केले आहे.

(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 1970 05:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).