Maharashtra Weather: महाराष्ट्र राज्यात 'या' भागांमध्ये पावसाचा इशारा, जाणून घ्या हवामान अंदाज
केरळ नंतर महाराष्ट्र राज्यातही पावसाची हजेरी लागणार आहे असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. येत्या १० दिवसांत राज्यात मान्सूनची सुरुवात होणार आहे.
Maharashtra Weather: केरळ राज्यात मान्सूनचं आगमन झाले आहे. केरळ नंतर महाराष्ट्र राज्यातही पावसाची हजेरी लागणार आहे असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. येत्या 10 दिवसांत राज्यात मान्सूनची सुरुवात होणार आहे. त्यामुळे लवकरच नागरिकांना ऊन्हापासून सुटका मिळणार आहे. राज्यात उकाडा कमी होणार असल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त केले आहे. राज्यात गेले अनेक दिवसांपासून ऊन पावसाचा खेळ सुरुच आहे. येत्या 24 तासांत महराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाच्या सरी बसरणार आहे. तर हा पाऊस हा मध्यम ते हलक्या स्वरुपाचा असणार आहे.( हेही वाचा- मुंबईसह पालघर, ठाणे, रायगड, जिल्ह्यात पुढील 2 दिवस उष्णतेची लाट; कसे असेल उद्याचे हवामान? IMD ने दिली माहिती)
महाराष्ट्र्सह तामिळनाडू, लक्षद्विप, केरळ, नागालॅंड, मणिपूर, मिझोराम, आसाम, अरुणाचल प्रदेश या राज्यात पावासाची शक्यता आहे. राज्यातील कोकण विभागातील मुंबई आणि मुंबई उपनगर परिसरात हलक्या पावासाची शक्यता वर्तवली आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात पावसाचा अंदाज आहे. राज्यात पावसाची सुरुवात होणार असल्याने शेतीपूर्वीची काम करून घ्यावीत असा सल्ला भारतील हवामान खात्याने दिला आहे.
केरळमध्ये काल पावसाच्या हलक्याते मध्यम स्वरुपाच्या सरी बरसल्या. राज्यात काही ठिकाणी तापमानात घट झाल्याचे दिसून येत आहे. हवामान विभागाने राज्यात 5 ते 6 जून पर्यंत मान्सून दाखल होईल, असा अंदाज वर्तवला आहे. केरळमध्ये पावसाची सुरुवात झाल्याने लवकरच मुंबईतही पाऊस दाखल होईल. महाराष्ट्रातील काही भागात आज ढगाळ वातावरण असेल. 15 जून पासून संपुर्ण राज्यात वरूनराजाचं आगमन होईल.