IPL Auction 2025 Live

Maharashtra Rain Update: मुसळधार पाऊस पुनरागमनाच्या मनस्थितीत

Monsoon पुन्हा एकदा सक्रीय होतो आहे. वरुनराजाचे पुनरागमन राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे आहे.

Rain | representative pic- (photo credit -pixabay)

Weather Forecast of Maharashtra: यंदा काहीसा उशीरा दाखल झालेला मान्सून जुलै महिन्याच्या मध्यापासून अखेरपर्यंत दमदार बरसला. त्यानंतर महिनाअखेरीच्या काही शेवटच्या दिवसांमध्ये त्याने विश्रांती घेतली. मात्र, आता ऑगस्ट महिन्यात मुसळधार पाऊस पुन्हा एकदा दमदार पुनरागमन (Maharashtra Rain Update) करण्याच्या तयारीत दिसतो आहे. भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार कोकणामध्ये दमदार पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता आहे. परिणामी कोकणामध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. राज्यातही येत्या बुधवार (2 ऑगस्ट) पासून पाऊस सकारात्मक स्थितीमध्ये आहे त्यामुळे राज्याच्या विविध ठिकाणी वरुनराजा बरसू शकतो.

हवामान विभागाने माहिती देताना सांगितले की, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. बुधवारपर्यंत या क्षेत्राचा प्रवास पश्चिम बंगालमधील गंगा खोरे ओलांडून पुढे सरकण्याची शक्यता आहे. असे घडले तर ही प्रमाली तशीच पुढे वायव्येकडे सरकुन महाराष्ट्रात पर्जन्यवृष्टीला पुरक स्थिती निर्माण होईल. परिणामी कोकणात दमदार पाऊस कोसळेल. या पार्श्वभूमीवर आयएमडीने रत्नागिरीला गुरुवारसाठी (3 ऑगस्ट) ऑरेंज अलर्ट दिला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. तर पालघर, ठाणे जिल्ह्यातही ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. शुक्रवारीही या दोन जिल्ह्यांमध्ये (पालघर, ठाणे) मुसळधार पावसाची शक्यता आहे. (हेही वाचा, Maharashtra Rains: पुढील 24 तासांकरिता कोणत्याही जिल्ह्याला रेड अलर्ट नाही; जाणून घ्या आपत्तींच्या चेतावणी व मदतीसाठी उपयुक्त ॲप्स आणि फोन नंबर)

दरम्यान, पुणे आणि सातारा घाट परिसरात बुधवारी दमदार पावसाछी शक्यता असल्याने या ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. कोल्हापूरातील घाट परिसरातही पावसाची दमदार हजेरी पाहायला मिळेल. ही स्थिती शनिवारपर्यंत कायम राहू शकते, असेही आयएमडी म्हणते.

उत्तर महाराष्ट्राबाबत सांगायचे तर बुधवार, आणि गुरुवार म्हणजेच अनुक्रमे 2 आणि 3 ऑगस्ट हे दिवस महत्त्वाचे असतील. या कालावधीत नंदूरबार, जळगाव, नाशिक जिल्ह्यात मेघगर्जनेसह मुसधळार पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातही पावसाचा जोरदार शिडकाव पाहायला मिळेल. खास करुन जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर आणि संभाजीनगरमध्ये मुसधार पाऊस पडू शकेल. मात्र, समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्राचा फारसा प्रभाव दीर्घकाळ राहणार नाही. त्यामुळे राज्यातील पावसाची स्थितीही विशेष अशी राहणार नसल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.