Rain in Mumbai: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा रायगड दौरा रद्द झाल्याचे वृत्त

त्यानुसार उद्याच्या म्हणजेच 14 जूनच्या रायगड दौऱ्यात मुख्यमंत्री चौल, बोर्ली, मुरुड येथे चक्रीवादळग्रस्तांना मदत साहित्य आणि अनुदान वाटप करणार होते. तसेच, चौल येथे ते आप्पासाहेब धर्माधिकारी यांचीही भेट घेणार होते

Chief Minister Uddhav Thackeray | (Photo Credits: Pixabay | Archived, edited, symbolic images)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Chief Minister Uddhav Thackeray) यांचा पूर्वनियोजीत रायगड (Raigad) दौरा रद्द करण्यात आला आहे. मुंबई आणि अलिबाग येथे पडत असललेल्या मुसळधार पावसामुळे (Rain in Mumbai) मुख्यमंत्र्यांचा उद्याचा (14 जून) दौरा रद्द करण्यात आल्याचे समजते. निसर्ग चक्रीवादळ (Cyclone Nisarga) संकटामुळे नुकसानग्रस्त झालेल्या नागरिकांना मदत वाटप करण्यासाठी मुख्यमंत्री रायगड दौऱ्यावर निघणार होते. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवरवर चोख बंदोबस्त आणि स्थानिक प्रशासन सज्ज ठेवणे आवश्यक असते. मात्र, संबंधित यंत्रणेला मुसळधार पावसाचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे हा दौरा तात्पुरता रद्द करण्यात आला आहे. लवकरच पुन्हा नव्याने या दौऱ्याचे नियोजन केले जाणार असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांचा पूर्वनियोजीत दौरा असल्याने त्याचे व्यवस्थापण आणि वेळापत्रकही ठरले होते. त्यानुसार उद्याच्या म्हणजेच 14 जूनच्या रायगड दौऱ्यात मुख्यमंत्री चौल, बोर्ली, मुरुड येथे चक्रीवादळग्रस्तांना मदत साहित्य आणि अनुदान वाटप करणार होते. तसेच, चौल येथे ते आप्पासाहेब धर्माधिकारी यांचीही भेट घेणार होते. याशिवाय निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसलेल्या रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी, नुकसानग्रस्तांना सानुग्रह अनुदान, सौर कंदील, इतर साहित्याचे वाटप असाही कार्यक्रम या दौऱ्यात नियोजित होता. (हेही वाचा, Cyclone Nisarga: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतली भेट, निसर्ग चक्रीवादळ आपत्तीतील नुकसान भरपाईबाबत चर्चा)

महाराष्ट्रासाठी यंदाचे वर्ष काहीसे अडचणीचे आणि नैसर्गिक आपत्तीचे ठरत आहे. आगोदर दुष्काळ, त्यानंतर कोरोना आता चक्रीवादळ त्यातच मध्ये टोळधाड अशी एक ना अनेक संकटं यंदा एकाच वेळी महाराष्ट्रावर चाल करुन येत आहेत. दरम्यान, आता पावसाळाही जवळपास सुरु होत आहे. त्यामुळे राज्य सरकार आणि प्रशासनावरील जबाबदरी अधिक वाढली असून, जनतेच्याही सरकारकडून आपेक्षा आहेत.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif