Raigad Lok Sabha Election 2024: महाडमध्ये मतदानासाठी निघालेल्या मतदाराचा मृत्यू; रस्त्यातच चक्कर येऊन कोसळले
उन्हाचे चटके तीव्र होण्यासाठी आधी मतदान करण्याच्या हेतून मतदार लवकर मतदाने केंद्रावर रांगा लावत आहते. मात्र, याच दरम्यान महाडमध्ये एका मतदाराचा मतदान केंद्राबाहेर मृत्यू झाला आहे.
Raigad Lok Sabha Election 2024: राज्यातील काही मतदार संघात आज लोकसभा निवडणूक(Loksabha Election 2024) च्या तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान(3rd Phase Voting Day) होत आहे. मतदार आपला हक्क बजावण्यासाठी आणि योग्य उमेदवार निवडूण आणण्यासाठी कडक उन्हाची तमा न बाळगता मतदान केंद्रावर गर्दी करत आहेत. मात्र, या दरम्यान अनेक ठिकाणी मतदानाला गालबोट लागल्याचं चित्र आहे. महाडमध्ये मतदानासाठी निघालेल्या मतदाराचा मृत्यू (Voter Died)झाला आहे. प्रकाश चिनकटे असे मृत मतदाराचे नाव आहे. ते महाड तालुक्यातील दाभेकर कोंड किंजळोली येथील रहिवासी होते.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रकाश चिनकटे हे मतदान करण्यासाठी सकाळी घराबाहेर पडले. मतदान केंद्र पोहोचणार त्या आधीच अवघ्या १०० मीटर अंतरावर असताना चिनकटे हे रस्त्यावरच कोसळले. हे पाहून नागरिकांनी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे गावात शोककळा पसरली आहे. सध्या रायगड जिल्ह्यात तापमानाचा पारा चांगलाच वाढला आहे. सकाळी ८ नंतरच उन्हाच्या तीव्र झळा जानवू लागतात. त्यामुळे नागरिक दुपारी घराबाहेर पडणे टाळतात.
त्यामुळे नागरिकांना मतदानापूर्वी योग्यती तयारी करून घराबाहेर पडावे. सैल आणि सुती कपडे घालावे. ज्याने घाम आला तरी त्याचा त्रास होणार नाही.