Raids On PFI: राज्यात आणि देशात पाकिस्तान समर्थक घोषणा देण्याचा अधिकार कोणालाही नाही: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
PFI विरुध्द आजच्या मोठ्या कारवाईनंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रीया दिली आहे.
पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया विरोधात (PFI) आज पुन्हा एकदा राज्यात मोठी कारवाई करण्यात आली. राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA), दहशतवाद विरोधी पथक (ATS) तसेच स्थानिक पोलिसांच्या (Police) सहकार्याने ही कारवाई करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील (Maharashtra) अनेक जिल्ह्यांमध्येही पीएफआयविरोधात (PFI) कारवाई करण्यात आली आहे. राज्यात औरंगाबाद (Aurangabad), सोलापूर (Solapur), अमरावती (Amravati), पुणे (Pune), ठाणे (Thane), मुंबई (Mumbai), अहमदनगर (Ahmednagar), जालना (Jalna), नांदेड (Nanded), कल्याण (Kalyan), परभणी (Parbhani), पुणे (Pune) आदी ठिकाणी छापेमारी करण्यात आली. राज्यात 50 ते 55 ठिकाणांवर छापेमारी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तसेच आज केलेल्या कारवाईत पुण्यातून 6 जणांना, औरंगाबादेत 14, अहमदनगर मध्ये दोघांना तर सोलापूर, जालना आणि नांदेडमध्ये प्रत्येकी एकाला ताब्यात घेण्यात आले आहे.
तरी आजच्या मोठ्या कारवाईनंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी पहिली प्रतिक्रीया दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आमचे सरकार राज्यातील सर्व देशद्रोही घटकांचा नक्कीच नायनाट करेल. राज्यात आणि देशात पाकिस्तान (Pakistan) समर्थक घोषणा देण्याचा अधिकार कोणालाही नाही, असे कृत्य करणाऱ्यांवर आम्ही कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. (हे ही वाचा:- All India Imams Council state chief Maulana Irfan Daulat Nadvi आणि PFI सदस्य Rashid Shahdain Shaheed Iqbal नाशिक पोलिसांच्या ताब्यात)
तर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) म्हणाले पीएफआय (झइघ) विरोधात होणारी कारवाई हे सर्व काही नियमानुसार होत आहे. गेल्या चार-पाच वर्षांपासून या प्रकरणाचा तपास सुरू होता. पुरावे गोळा केल्यानंतरच कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) दिली आहे. तर पीएफआयला (PFI) देशात फूट पाडायचं कारस्थान करत होती असं उपमुख्यमंत्री म्हणाले.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)